कोरोनाचा वाढता कहर मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ इशारा..
The Chief Minister gave a 'yes' warning to Corona's growing havoc ..
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
शनिवार पासून पुण्यामध्ये सात दिवसांसाठी हॉटेल, बार, मॉल, सिनेमागृह पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. हॉटेलमधून होम डिलेव्हरी सुरु राहणार आहे. तर पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था PMPML पुढील सात दिवसांसाठी बंद असणार आहे. सर्व धार्मिक स्थळे देखील पुढील सात दिवसांसाठी बंद असणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे सायंकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंत अत्यावशक सेवा वगळता पूर्णपणे संचारबंदी असणार आहे.
दोन दिवसांत जर कोरोना परिस्थितीमध्ये सुधारणा झाली नाही तर दुर्दैवाने मला लॉकडाऊन करावा लागेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला दिला आहे.