जमिनीतील उपलब्ध ओलावा जास्त काळ टिकण्यासाठी आच्छादनाचा उपयोग करावा. पॉलिथिन पेपर गव्हाचा भुस्सा ज्वारीचा कडबा उसाचे पाचट किंवा कोणत्याही पिकाचे टाकाऊ काढ पालापाचोळा या सर्व घटकांचा वापर करून आच्छादनासाठी वापर करता येतो.
उन्हाळ्यामध्ये शक्यतो पाण्याची कमतरता असल्यास ठिबक सिंचनचा वापर करावा.
कडक उन्हाळ्यामध्ये पिकांस पाणी देऊ नये कारण पिकांस चरका बसतो ( पिकांच्या पानाच्या कडा करपतात). पिकांची वाढ खुटते व 50 ते 60 % पाण्याचे बाष्पीभवन होते.
कडक ऊनाळ्यामध्ये सायंकाळी ते पूर्ण रात्री व सकाळी 10 पर्यंत पिकांस पाणी द्यावे वेळेस पिकांस पाणी देऊ नये.
काढणीसाठी तयार असलेले रब्बी पीक म्हणजेच ज्वारी हरभरा गहू करडई या पिकांना लवकरात लवकर काढणी करून त्याची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. साठवणुकीची जागा ओली, किंवा उंदीर, तसं घटकाचा त्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी त्याला व्यवस्थित ताडपत्री ने झाकावे. मळणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी साठवण करावी.