ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Ration Card | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! रेशन कार्डवरील धाण्याऐवजी खात्यात पैसे वितरण सुरू, तुम्हाला मिळणार का?

Ration Card | आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक असणारे रेशन कार्ड हे अतिशय महत्त्वाचे आहे. या रेशन कार्डावरून आपण आपल्या ओळखीचा पुरावा दाखवू होऊ शकतो. तसेच रेशन कार्डचा (Ration Card) वापर फक्त कागदपत्रांसाठीच केला जात नाही, तर यावर सरकारकडून स्वस्थ अन्नधान्य पुरवठा देखील केला जातो. आता रेशन कार्ड (Ration Card Update) धारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता रेशन कार्डधारकांना धाण्याऐवजी खात्यात पैसे मिळणार आहेत.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

कोणत्या जिल्ह्यातील नागरिकांना पैसे मिळणारं?

राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशीम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा अशा 14 जिल्ह्यांमधील दारिद्रय रेषेखालील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा नियमाखाली अल्पदरात गहू, तांदूळ शिधा देण्यात येतो. आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रेशन कार्डवरील शिधा बंद होऊन खात्यात पैसे येणार आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

लाभ घेण्यासाठी करावा लागेल अर्ज

रेशन कार्ड वरील धाण्याऐवजी तुम्हाला पैशांचा लाभ घेण्यासाठी एक अर्ज करावा लागणार आहे. या अर्जानंतर तुम्हाला याचा लाभ मिळेल. प्रति लाभार्थी 150 रुपये प्रति महिना रक्कम खात्यात जमा केली जाणार आहे. याप्रमाणे तीन महिन्यांचे 450 रुपये खात्यात जमा केले जाणार आहेत.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Web Title: Good news for farmers! Instead of money on the ration card, money will be distributed to the account, will you get it?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button