ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

NA Land | बिग ब्रेकिंग! आता गावात ‘एनए’ परवान्याची गरज नाही; जाणून घ्या गावठाणापासून किती मीटर अंतरापर्यंत आहे अट ?

NA Land | शेत जमिनीच्या कायद्यात सातत्याने बदल होत जातात. हे बदल शेतकऱ्यांना लवकरात लवकर समजणं महत्त्वाचं असतं. अशातच आता एनएबाबत (NA Land) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तर शेतकरी मित्रांनो आता गावालगत असलेल्या जमिनीवर घरांचा प्रकल्प किंवा अन्य काही करायचे असेल तर देखील त्यासाठी ‘एनए’ (NA Land) परवाना घेण्याची गरज नसणार आहे. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

एनएची गरज नाही..
आता गावठाणलगतच्या जमीनीवर असलेली घरे किंवा प्रकल्प अथवा इतर काही असल्यास त्यासाठी आता एनए परवाना घेण्याची गरज नाही. याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तर शेतकरी मित्रांनो जरी याबाबत तुम्हाला एनए परवाना घ्यावा लागत नसला तरी तुम्हाला एक प्रक्रिया करावी लागणार आहे. तर तुम्हाला विभागाला अकृषिकचे म्हणजेच एनएचे शुल्क भरावे लागणार आहे.

काय आहे 200 मीटर अंतराची अट?
यानंतर त्या जमिनीचा वापर तुम्हाला अकृषिक म्हणून करता येतो. तर अशाप्रकारे तुम्ही ती जमीन एनएसाठी परवाना न काढता वापरू शकता. मात्र तुम्हाला त्यासाठी कर भरावा लागणार आहे. जर तुमची जमीन गावठाणापासून 200 मीटरच्या अंतरात असेल, तर आता तुम्हाला एनएचा परवाना आता लागणार नाही.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

एनए म्हणजे काय? आणि एनए का करतात?
सर्वसाधारपणे शेतीचा पिक घेण्यासाठी वापर केला जातो. परंतु ती जमीन किंवा जागा जर औद्योगिक, वाणिज्य किंवा निवासी वापरासाठी वापरली जाते, त्यावेळी त्या जमिनीसाठी कायद्याची परवानगी घेणे आवश्यक असते. त्या जमिनीचं रूपांतर बिगरशेतीमध्ये करावे लागते. याचं प्रक्रियेला एनए (अकृषिक) असे म्हणतात. राज्यामध्ये तुकडेबंदी कायदा लागू असल्यामुळे तुम्हाला जमिनीच्या तुकड्याची खरेदी विक्री करता येत नाही. यासाठी जमिनी करणे एनए गरजेचे असते. जमिन एनए केल्यावर तुम्ही विक्री करू शकता.

Web Title: Big Breaking! Now there is no need for ‘NA’ license in the village; Know how many meters distance from the village is the condition?

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button