ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Maharashtra Cabinet Decision | शेतकऱ्यांसाठी कांदा अनुदान ते पिक विम्यापर्यंत वाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय

The decision of the State Mantra Mandal meeting! Read important government decisions from onion subsidy to crop insurance for farmers

Maharashtra Cabinet Decision | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात सार्वजनिक मंत्रिमंडळाचे विविध निर्णय आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारसह पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. त्याचवेळी शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय (Maharashtra Cabinet Decision) घेण्यात आले आहेत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

Maharashtra Cabinet Decision | राज्य मंत्रमंडळाच्या बैठकीतील निर्णय
मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा ठाणे येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत
मुंबईमध्ये जानेवारीत आंतरराष्ट्रीय महोत्सव
मध्य नागपूरमधील झोपडपट्टीतील घरांसाठी मुद्रांक शुल्कात कपात

837 crore project for cyber security in the state राज्यात सायबर सुरक्षेसाठी 837 कोटींचा प्रकल्प
सायबर गुन्ह्यांविरुद्ध तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्यात 837 कोटी रुपयांचा सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पामुळे नागरिकांना एका फोनद्वारे, 24 तास कार्यरत कॉल सेंटरवर तक्रार नोंदवता येणार आहे.

वाचा : Cabinet Decision | मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! गौरी-गणपतीचे सणालाही मिळणार आनंदाचा शिधा; सविस्तर वाचा मंत्रिमंडळ निर्णय

Crop insurance पिक विमा
महाराष्ट्रात 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. नियमानुसार पीक विम्याचा अग्रीम, पिण्याचे पाणी, चारा उपलब्धता यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Complete exemption in stamp duty to various companies of the Centre केंद्राच्या विविध कंपन्यांना मुद्रांक शुल्कात संपूर्ण सूट
केंद्राच्या विविध कंपन्यांना मालमत्ता आणि जमिनीच्या हस्तांतरण दस्तांवर मुद्रांक शुल्कात संपूर्ण सूट देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Loans to distressed sugar mills अडचणीतील साखर कारखान्यांना कर्ज
आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार. हे कर्ज अटी आणि शर्तींच्या अधीन राहून उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Necessary planning in the face of rain पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नियोजन
राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 81.07 टक्के पाऊस झाला असून कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ते नियोजन काटेकोरपणे करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: The decision of the State Mantra Mandal meeting! Read important government decisions from onion subsidy to crop insurance for farmers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button