ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
PM KISANकृषी बातम्या

PM Kisan | काऊंटडाऊन सुरू! शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या जमा होणार पीएम किसानचा 13वा हप्ता, जाणून घ्या वेळ

PM Kisan | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सर्व काही ठीक राहिल्यास, सोमवार, 27 फेब्रुवारी 2023 रोजी पीएम किसान सन्मान निधीच्या (PM Kisan) 13 व्या हप्त्याचे पैसे देशातील 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातील. बातम्यांनुसार, पंतप्रधान मोदी 27 फेब्रुवारीला पीएम किसान योजनेचा (PM Kisan 13th installment) 13 वा हप्ता जारी करू शकतात. तसे झाले तर सरकारकडून शेतकऱ्यांना (PM Kisan) हे होळीचे मोठे भेट ठरेल.

होळीपूर्वी पीएम किसान सन्मान योजनेच्या 13व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या शेतकरी आणि लाभार्थ्यांना सरकार भेटवस्तू देणार आहे. देशातील शेतकरी (Agriculture) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 13व्या हप्त्यासाठी अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. मात्र, आता त्यांची प्रतीक्षा संपणार आहे. तिसर्‍या हप्त्याबाबत सरकारकडून एक मोठे अपडेट समोर येत आहे. या अंतर्गत, पीएम किसान (PM Kisan 13 installment 2023) च्या 13 व्या हप्त्यासाठी पैसे जारी करण्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया पीएम नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात 13व्या हप्त्याचे पैसे कधी पाठवणार आहेत.

वाचाठरलं तर! ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2 हजार, त्वरित तपासा तुम्हाला मिळणार का?

कधी होणार हप्ता जमा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 फेब्रुवारी 2023 रोजी देशात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता (PM Kisan Yojana) जारी करणार आहेत. या दिवशी 13 व्या हप्त्यासाठी 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहेत. केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 फेब्रुवारीला कर्नाटकचा दौरा करणार आहेत. पीएम मोदी दुपारी 3:15 वाजता कर्नाटकातील बेलागावी येथे पोहोचतील, जिथे अनेक विकास उपक्रमांची पायाभरणी करण्यासोबतच पीएम किसानच्या 13व्या हप्त्याचेही विमोचन करतील. PM मोदी 13व्या हप्त्याची रक्कम DBT द्वारे 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहेत.

वाचामहावितरणाचा सामान्यांसह शेतकऱ्यांना झटका! राज्यात प्रति युनिट ‘इतक्या’ रुपयांनी महागणार वीज

पीएम किसान योजना
PM किसान सन्मान योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू झाली. 24 फेब्रुवारी 2023 रोजी या योजनेला 4 वर्षे पूर्ण झाली आहेत. PM किसान सन्मान योजना (PM Kisan Samman Yojana) अंतर्गत, देशातील पात्र शेतकऱ्यांना सरकारकडून वार्षिक आधारावर 6000 रुपये दिले जातात, तथापि, सरकार शेतकऱ्यांना 6000 रुपये एकाच वेळी देत नाही तर 3 समान हप्त्यांमध्ये देते. 2000-2000 रुपये देते. या योजनेंतर्गत आत्तापर्यंत शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्यापर्यंत लाभ मिळत आहे. त्याचबरोबर आता शेतकरी 13व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

अन्यथा शेतकरी राहणार वंचित
योजनेअंतर्गत सरकारने आधीच स्पष्ट केले आहे की, जर पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना 13 व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे आजपर्यंत हे महत्त्वाचे काम केले नसेल, तर विलंब न लावता आजच पूर्ण करा. तुम्ही असे न केल्यास, तुम्ही पीएम किसान सन्मान निधीच्या 13 व्या हप्त्याचा लाभ घेण्यापासून वंचित राहू शकता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Countdown begins! Only one day left, the amount of 13th installment of PM Kisan will be credited to farmers’ accounts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button