ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या
ट्रेंडिंग

Job Requirements | शेतकऱ्यांच्या पोरांसाठी सुवर्णसंधी! 4 हजार 660 जागांसाठी रेल्वे विभागात अर्ज सुरू, ‘असा’ करा अर्ज

Job Requirements | सरकारी नोकरीच्या इच्छुक तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने रेल्वे संरक्षण दल (RPF) मध्ये कॉन्स्टेबल आणि सब-इन्स्पेक्टरच्या 4660 जागांसाठी भरती (Job Requirements) प्रक्रिया सुरू केली आहे. 15 एप्रिलपासून सुरू झालेली ही अर्ज प्रक्रिया 14 मे 2024 पर्यंत चालणार आहे.

वाचा: भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये बंपर भरती! 4000 पदांसाठी करा अर्ज, 10वी 12वी शिकलेले करू शकतात अर्ज, पाहा अर्ज प्रक्रिया

पात्रता आणि वयोमर्यादा:

  • कॉन्स्टेबल:10वी उत्तीर्ण, 18 ते 28 वर्षे वय (1 जानेवारी 2024 पर्यंत)
  • सब-इन्स्पेक्टर: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, 18 ते 28 वर्षे वय (1 जानेवारी 2024 पर्यंत
  • निवड प्रक्रिया:CBT 1 आणि CBT 2 (लेखी परीक्षा) शारीरिक चाचणी

कागदपत्र पडताळणी अर्ज शुल्क:

सामान्य आणि OBC: ₹500SC, ST, महिला आणि माजी सैनिक: ₹250वेतन:RPF SI: ₹43,000 ते ₹52,000 प्रति महिनाRPF कॉन्स्टेबल: ₹37,235 ते ₹41,141 प्रति महिना

हेही वाचा: कर्मचारी राज्य विमा महामंडळात १९३० जागांसाठी भरती! ‘असा’ करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर

अर्ज कसा करावा:?

ऑनलाइन अर्ज: rrbapply.gov.in ला भेट द्या. नोकरी विभागातून संबंधित पद निवडा. मूलभूत माहिती भरून नोंदणी करा आणि User Id आणि पासवर्ड तयार करा.लॉग इन करून अर्ज अचूकपणे भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्जाची फी ऑनलाइन भरा. अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत जतन करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button