मका पिकावरील लष्करी अळी (Military larvae) अत्यंत विध्वंसक कीड (Destructive pests) आहे. या किडीचे मका आवडते पीक असून, या शिवाय ज्वारी, ऊस, गहू व इतर पिकांवरही ती उपजीविका करू शकते. यामुळे ही कीड जास्त काळ सुप्त अवस्थेत न जाता हिचा जीवनचक्र कायम चालू राहतो.
मका लागवड केल्यानंतर ८ ते १० दिवसांत मक्यावरील लष्करी अळींचा पतंग (Military larvae moth) मक्याच्या पहिल्या पानावरील रोपावर अंडी देतो. मादी पंतग एकावेळी २००-३०० अशा पध्दतीने ७ ते ८ वेळा २००० अंडी देते. तेथून पुढे २-३ दिवसात अळींची पहिली अवस्था बाहेर पडते. पुढील ४-५ दिवसात अळी दुसरी अवस्था पार पडते. तर १८-१९ दिवसांनतर ही अळी तिसरी अवस्था पार करते. अळी अवस्था २१-२८ दिवस टिकते व त्यानंतर अळ्या जमिनीत कोषावस्थेत जातात. कोषावस्था ८-१० दिवस टिकते. जीवनचक्र पुरे होण्यास ५-६ आठवड्यांचा काळ लागतो.
वाचा : यंदाच्या वर्षी सोयाबीनचे उत्पादन विक्रमी होणार का? सोयाबीन उत्पादकांनी घ्या ‘ही’ काळजी…
- मका पिकांचे दर दोन दिवसांनी निरीक्षण करावे. सर्व उपाययोजनांचा एकात्मिक पद्धतीने (In an integrated manner) अवलंब केल्यास मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे (American military larvae) व्यवस्थापन करून मक्याचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते.
- मक्याची लागवड केली नसेल त्यांनी सायन्ट्रॅनिलीप्रोल ह्या १९.८% + थायोमिथॉक्झॅम १९.८% या कीडनाशकाची (Of pesticides) बीज प्रक्रिया केलेले बियाणे खरेदी करावे.
- सलग मका पिकावर ह्या किडीला अंडी घालणे आवडत असल्याने मक्याच्या ४ ओळीनंतर तुर, मुग, उडीद या पिकाच्या २ ओळी घ्याव्यात. मक्याभोवती चवळीची लागवड केल्यास त्यावरील मावा खाण्यासाठी ढाल किडीसह इतर मित्र किडींची संख्या वाढवून नैसर्गिकरीत्या अळीचे चांगले नियंत्रण मिळण्यास मदत होते.
वाचा : कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळून देणारे, ‘उडीद’ पिकाबद्दल जाणून घ्या, संपूर्ण माहिती…
- ५ टक्के निंबोळी अर्काची (Neem extract) व बी.टी. या जैविक कीटकनाशकासह २० ग्रॅम प्रती १० लि. पाणी किंवा मेटा. हायझीयम नोमुरीया, बिव्हेरिया ह्या बुरशीजन्य कीटकनाशकासह ४० ग्रॅम प्रती १० लीटर पाणी अशी प्रतिबंधात्मक फवारणी (Preventive spraying) करावी.
- रासायनिक कीटकनाशकाची (Of chemical pesticides) फवारणी करावयाची आहे, त्यांनी इमामेक्टीन बेन्झोएट ५% – ४ ग्रॅम प्रती लिटर पाणी, थायोमिथॉक्झॅम १२.६०% + लैमडा सायहॅलोथ्रीन ९.५०% – ५मिली प्रती १० लिटर पाणी, क्लोरअन्ट्रॅनिलीप्रोल १८.५% – ४ मिली प्रती १० लिटर पाणी, स्पीनोसॅड-३ मिली प्रती लिटर पाणी या कीटकनाशकापैकी कुठल्याही एका किडनाशकाची फवारणी करावी. अधिक माहिती मिळवण्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
- जमिनीवर गुळाचे (Of jaggery) पाणी फवारल्यास मुंगळे आकर्षित होऊन अळ्यांचे नियंत्रण करतात तर पोंग्यात माती, वाळू व चुना ह्यासारखे पदार्थ ९:१ या प्रमाणात टाकल्यास अळ्या रोगग्रस्त होऊन मरतात.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
हे ही वाचा :
1. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये फवारणी करताना घ्या, ‘अशी’ काळजी!
2. बांबूची लागवड करा आणि मिळवा प्रतिमहा साडेचार लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न !