ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य

Dental Pain | दात दुखतोय ? चिंता नका करू ! करून बघा ‘हे’ तीन सोप्पे घरगुती उपाय …

Dental Pain |आपले दात हा शरीरातील फार महत्त्वाचा अवयव आहे. दातामुळे आपण अन्न व्यवस्थित चावून खाऊ शकतो. यामुळेच आपली पचनक्रिया सुरळीत होते. मात्र, कधी कधी हे दात फार त्रास देतात. दातांच्या वेदना सहन होण्याच्या पलीकडे असतात. त्यात रात्रीच्या वेळी अचानक दात दुखू लागले तर वेगळीच तारांबळ उडते.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

दात दुखण्याची कारणे

१) दात किडल्याने दातदुखी उद्भवते.
२) हिरड्यांचे रोग झाले असल्यास दात दुखतात.
३) अपघातात जबड्याला दुखापत झाल्यास अनेकदा दातदुखी होते.
४) एड्समध्ये काही लक्षणं ही दातांच्या रोगांशी निगडीत असतात.

दरम्यान रात्री अपरात्री दातदुखी झाल्यास तात्पुरता उपाय म्हणून तुम्ही खालील गोष्टी करू शकता.

१) दातांच्या मध्ये लवंग ठेवा

लवंग हा एक मसाल्याचा समजला जातो. मात्र यामध्ये काही असे घटक आहेत ज्यामुळे तुमची दातदुखी कमी होते. ज्यावेळी तुम्हाला दातदुखीचा त्रास जाणवत असेल त्यावेळी जिथे दुखत आहे त्या दातांच्या मध्ये लवंग ठेवून ती थोडी थोडी चावावी. लवंगेचा रस दातांमध्ये गेला की दातदुखी कमी होते. लवंग दातांमध्ये धरल्याने तुमची दातदुखी मध्ये बऱ्यापैकी फरक पडतो.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

२) पेरूची पाने चावून खा.

आपण पेरू आवडीने खातो. बऱ्याचदा पेरू खान्यानेच दात दुखू लागतात. मात्र तुम्हाला माहितीये का की, पेरूच्या झाडाची पाने खूप फायदेशीर असतात. पेरूची पाने स्वच्छ धुवून ती हळू हळू चावून खाल्ली की, तुमचा दातदुखीचा त्रास कमी होतो.

३) गरम पाणी

गरम पाणी हा दात दुखीवरचा जालिम उपाय समजला जातो. तुमचा दात दुखत असेल तर एका भांड्यात गरम पाणी करा आणि त्यात अर्धा चमचा मीठ टाका. त्यानंतर या पाण्याचे घोट घ्या आणि ते तोंडात तसेच ठेवा ते पाणी गिळू नका जेणेकरून तुमच्या तोंडातील जंतू निघून जातील. ही प्रक्रिया जर तुम्ही १० ते १५ मिनिटे केली तर तुमचा दातदुखीचा त्रास नक्कीच दुर होईल.

Homemade remedies to avoid dental pain

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button