ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
राशिभविष्य

Peepal Pooja | पिंपळाची पूजा करा आणि आयुष्यातील सगळी दुःखे करा दूर ! पितृदोषापासूनही मिळेल मुक्ती

Peepal Pooj|हिंदू धर्मात (Hindu) लोक विविध झाडांची पूजा करतात. दरम्यान गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाचे झाड त्यांचेच स्वरूप आहे असे सांगितले आहे. म्हणूनच पिंपळाची पूजा केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपले दुःख दूर करतात. अशी लोकांची धारणा आहे.

पिंपळाचे झाड आहे पूजनीय

हिंदू धर्मामध्ये पिंपळाचे झाड (Peepal tree) पूजनीय आणि अत्यंत पवित्र मानले जाते. पौराणिक कथा आणि शास्त्रानुसार भगवान विष्णू पिंपळाच्या मुळामध्ये, केशव देठात, नारायण फांद्यामध्ये, भगवान हरी पानांमध्ये आणि फळांमध्ये सर्व देव वास करतात. त्यामुळे पिंपळाची उपासना खूप फायदेशीर आहे. मात्र या पूजेचेही काही नियम आहेत.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

जीवनातील सर्व दुःखे दूर करण्याचा उपाय

शनिवारी पिंपळाची पूजा केल्यास किंवा पिंपळाला स्पर्श केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. शनिवारी पिंपळाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला शनिशी संबंधित त्रासांना कधीही सामोरे जावे लागत नाही. अशा व्यक्तीच्या घरात लक्ष्मी वास करते आणि त्यांचे सर्व दुःख दूर होतात. तसेच पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने जीवनातील दुःख आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते.

पिंपळाची पूजा कशी करावी

१) पिंपळाची पूजा करण्यासाठी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून पवित्र व्हावे.
२) पूजेच्या सुरुवातीला पिंपळाच्या झाडाला गायीचे दुध, तीळ आणि चंदन मिश्रित पाणी अर्पण करा.
३) जल अर्पण केल्यानंतर यज्ञोपवीत फुल, नैवेद्य आणि इअतर पूजन सामग्री अर्पण करा.
४) त्यानंतर सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे धूप-दीप दाखवून दिवा अवश्य लावावा.
५) आसनावर बसून किंवा उभे राहून मंत्र जप करावा.
६) जप केल्यानंतर आरती करावी.
७) पिंपळाला अर्पण केलेल्या पाण्याधील थोडे पाणी घरात शिंपडावे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

पिंपळाची पूजा करताना म्हणायचा जप

मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे। अग्रत: शिवरूपाय वृक्षराजाय ते नम:।।
आयु: प्रजां धनं धान्यं सौभाग्यं सर्वसम्पदम्। देहि देव महावृक्ष त्वामहं शरणं गत:।।

कमीत कमी १०८ वेळेस हा जप करावा. जप करण्यासाठी रुद्राक्षाच्या माळेचा उपयोग केला तर उत्तम. अशाप्रकारे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी आणि शांतता कायम निवास करते.

Some tips to remove sadness from your life

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button