ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Money lender | सावकाराने तुमची जमीन बळकावलीय का ? चिंता नका करू ! ‘हा’ अर्ज करा आणि मिळवा तुमची जमीन परत

Money lender |राज्यात काही वर्षांपूर्वी खासगी सावकारकी सुरू होती. यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जायची. या पिळवणुकीला निर्बंध घालण्यासाठी राज्य सरकारने १६ जानेवारी २०१४ रोजी ‘महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम’ राज्यभरात लागू केला होता. याअंतर्गत विश्वासघाताने जमीन बळकावणाऱ्या सावकाराविरूद्ध संबंधित शेतकऱ्याला थेट जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करता येत होती.

सावकार शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावतात

या कायद्यानुसार चुकीचे खरेदीखत थेट रद्द करण्याचा अधिकार जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आला आहे. मात्र, तक्रार केलेल्या दिवसापासून मागे १५ वर्षांपर्यंतचा तो खटला असणे बंधनकारक आहे.
महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वर्षी लाखो शेतकरी अडचणीच्यावेळी खासगी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतात. तर काहीजण विनापरवाना सावकारी देखील करतात. यावेळी भरमसाट चक्रवाढ व्याज आकारणी करून जमिनी बळकावल्या जातात.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

म्हणून शेतकरी कर्जासाठी सावकाराकडे जातात

बऱ्याचदा बँकांकडून पीक कर्ज वाटपासाठी भरपूर निकष लावले जातात. यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास विलंब होतो. यामुळे शेतकरी गावातील किंवा ओळखीतल्या सावकाराकडून कर्ज घेतात. अशावेळी शेतकऱ्यांकडून वेळेवर कर्जाची परतफेड न झाल्यास सावकार संबंधित शेतकऱ्याच्या जमिनीवर ताबा मिळवतो किंवा जमीन परत देत नाही.

मालमत्ता महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४

परंतु, जर एखाद्या शेतकऱ्याने सावकाराकडून कर्ज घेताना आपली मालमत्ता तारण म्हणून ठेवली असेल आणि सावकाराने बळजबरीने ती बळकावली असेल तर ती जमीन ‘ मालमत्ता महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४’ अंतर्गत तुम्हाला परत मिळू शकते. सावकाराने बळजबरीने शेतकऱ्याची जमीन बळकावली असेल तर त्या शेतकऱ्याने १५ वर्षांच्या आत तशी तक्रार तालुक्याचे सहायक निबंधक किंवा थेट जिल्हा निबंधकांकडे करणे आवश्यक आहे. तर तो खटला चालवून वस्तुस्थिती पडताळून निकाल दिला जातो.

अर्ज कसा करायचा ?

तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सहायक निबंधकांकडे किंवा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे शेतकरी याबाबत अर्ज करू शकतात. शेतकऱ्यांनी अर्ज केल्याच्या तारखेपासून १५ वर्षे मागे संबंधित जमिनीची रेजिस्ट्री (खरेदीखत) झाली असल्यास महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमाअंतर्गत हे प्रकरण निकाली काढले जाते. शेतकरी अगदी एका साध्या कागदावर देखील तो अर्ज करू शकतात.

तक्रारदार स्वतःची बाजू मांडू शकतात

‘माझ्या जमिनीवर संबंधित व्यक्तीने ताबा मिळवला आहे किंवा त्या व्यक्तीने जमीन बळकावली आहे’, असे शेतकऱ्यांना त्या अर्जामध्ये नमूद करावे लागते. तसेच त्यासोबत पुरावा म्हणून शेतकरी सावकाराकडून घेतलेले कर्ज, त्यावरील व्याज, यासंबंधीची कागदपत्रे जोडावी लागतात. महत्त्वाची बाब म्हणजे वकिलाची फी देण्याएवढी ऐपत नसलेले तक्रारदार शेतकरी स्वत:ची बाजू स्वत: देखील मांडू शकतात.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

हे पुरावे असणे महत्त्वाचे

तक्रारदाराकडे जमिनीचा ताबा अन्‌ जमिनीची मालकी सावकाराकडे असल्यास ती तक्रारदारासाठी जमेची बाजू ठरू शकते. यावेळी सावकाराने किती पैसे दिले, त्या रकमेवर किती व कसा व्याजदर आकारला, कोरे धनादेश घेतले का, चक्रवाढ व्याज आकारून मुद्दलापेक्षा अधिक रक्कम व्याजापोटी घेतली का, यासंबंधीचे पुरावे यावेळी महत्त्वाचे ठरतात.

सुरवातीला संबंधित तालुक्याचे सहायक निबंधक प्रकरणाची चौकशी करतात, त्याचा अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडे येतो. त्यानुसार वादी-प्रतिवाद्यांना नोटीस बजावून सुनावणी सुरु होते.

Submit complaint about money lender and get your land return

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button