चंदनाची शेती लागवड करून मिळवा लाखोंमध्ये उत्पन्न; पहा कसे सविस्तरपणे..
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आम्ही एक चांगली बिझनेस आयडिया (Business idea) आहे. ज्याद्वारे तुम्ही महिन्याला मोठी कमाई (Earn Money) करू शकता. तर आपण आज शेतकर्यांना चंदनाच्या शेती (sandalwood cultivation) बाबत पाहणार आहोत. याविषयी आपण सविस्तर माहिती पाहुया..
चंदनाला मागणी (sandalwood demand) आपल्या देशासह परदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. चंदनाच्या शेतीत तुम्ही जेवढे पैसे खर्च करता त्याच्या कितीतरी पट जास्त नफा होतो. यामध्ये खर्च जवळपास एक लाख रुपये येतो आणि नफा 60 लाख रुपयांपर्यंत होऊ शकतो.
हे हि वाचा
तरूण युवकांचा या व्यवसायाकडे कल –
चंदनाच्या शेतीने (cultivating sandalwood) बंपर नफा होतो. यामुळे तरूणांचा कल याकडे आहे. उत्तर प्रदेशच्या प्रतापगड (Pratapgarh) मध्ये उत्कृष्ट पांडेय हे अधिकार्याची नोकरी सोडून गावात चंदन लागवड (Sandalwood cultivation) करून चांगली कमाई करत आहेत.
सशस्त्र सीमा दलात (SSB) मध्ये असिस्टंट कमांडंट पदाचा राजीनामा देऊन उत्कृष्ट पांडेय गावात चंदन-हळदीची शेती करत आहेत. हरियाणामध्ये शेतकरी सुरेंद्र कुमार यांनी चंदनाच्या शेतीचा (Sandalwood farming) पहिला प्लांट लावला. सुरेंद्र कुमार यांनी 2 एकरमध्ये चंदनाची रोपे लावली आहेत. सुरेंद्र यांच्यानुसार, चंदनाच्या शेतीसाठी (Sandalwood farming) प्रति एकर सुमारे 4 लाख रुपयांचा खर्च आला आणि 10 वर्षानंतर प्रति एकर सुमारे 1 कोटी रुपयांचे उत्पन्न होत आहे.
चंदनाची शेती अशी करा-
चंदनाची झाडे दोन पद्धतीने तयार केली जातात. एक ऑर्गेनिक (organic farming) आणि दुसरी पारंपारिक पद्धतीने (In the traditional way). ऑर्गेनिक पद्धतीने चंदनाची झाडे तयार करण्यात सुमारे 10 ते 15 वर्ष लागतात. तर पारंपारिक पद्धतीने सुमारे 20 ते 25 वर्षांचा काळ लागतो. चंदनाचे झाड खुप महाग मिळते.
भारतात (india) चंदनाचे लाकूड जवळपास 8-10 हजार रुपये किलोने मिळते. तर परदेशात अनेकदा याची किंमत 20-25 हजार रुपये असते. एका झाडात जवळपास 8-10 किलो लाकूड सहज मिळते. तर जमीनीनुसार एक एकरमध्ये चंदनाच्या झाडातून 50 ते 60 लाखापर्यंत कमाई केली जाऊ शकते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा
- 😍 केंद्र सरकारचा मोठा निर्णय; किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 16 कोटी कर्ज वितरण करण्याचे ठेवले उद्दिष्टे..