ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

पीएम किसान योजनेचा हप्ता अडकला आहे? तर पुढील हप्त्यासोबत मिळवा मागील हप्ता, तो कसा? वाचा सविस्तर

कित्येकदा पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) लाभार्थ्यांना या समस्यांना सामोरे जावे लागते. हप्ते वेळेवर येत नसल्याने शेतकऱ्यांसाठी (farmers) ही चिंताजनक बाब होते. आता पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) लाभार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. हप्ते अडकले असतील किंवा उशिरा येत असतील तर चिंतेचा प्रश्न मिटला आहे. अडकलेला हप्ता पुढील हप्त्यासोबत आता मिळणार..

शेतकऱ्यांना वार्षिक हप्ता 6000 च्या ऐवजी आता 12000 मिळणार आहे. म्हणजे यांना दर चार महिन्यात 2000 ऐवजी आता 4000 रुपये मिळू शकणार आहेत.

हप्ता अडकला? यावर करा हे उपाय –

अनेक शेतकऱ्यांना 9 व हप्ता अडकलेला दिसून येत आहे. शेतकऱ्यांना (farmers) या समस्यांना सामोरे जावे लागत असताना पाहायला मिळत आहे. हप्ते अडकण्याचे सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) लाभार्थ्यांनी भरलेली माहिती चुकीची असू शकते. यामध्ये आपण जर पाहिले तर आधार कार्ड नंबर, बँक अकाउंट नंबर, मोबाईल नंबर चुकीचा भरलेला असू शकतो. पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) अधिकृत पोर्टलवर जाऊन ही माहिती चेक करून एडिट करून पुन्हा सबमिट करू शकता. दुरुस्ती करण्यासाठी https://pmkisan.gov.in/Grievance.aspx योजनेच्या या लिंक वर जाणे गरजेचे आहे.

हे ही वाचा –

पुढील हप्त्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत रजिस्टेशन करा.

ज्या शेयकर्यांनी PM kisan Samman Nidhi योजनेचा लाभ आतापर्यंत घेतला नाही. ते आता रजिस्ट्रेशन (Registration) करू शकतात. रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे. जर शेतकर्‍याचा अर्ज आता स्वीकारला गेला तर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये 2000 रुपये खात्यात येतील. यानंतर डिसेंबरमध्ये सुद्धा 2000 रुपयांचा हप्ता बँक खात्यात येईल. म्हणजे जर तुम्हाला 4000 रुपये मिळवायचे असतील तर तुमच्याकडे 30 सप्टेंबरपर्यंतची चांगली संधी आहे.

अशा प्रकारे करा रजिस्ट्रेशन

1) सर्वप्रथम PM Kisan ची अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर व्हिजिट करा.

2) यानंतर Farmers Corner नावाचे एक ऑपशन दिसेल.

3) नंतर याच्या खाली New Farmer Registration चे ऑपशन दिसेल. त्यावर क्लिक करा.

4) यानंतर नवीन पेज ओपन होईल. ज्यामध्ये Aadhaar number आणि Captcha भरा.

5) नंतर काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल.

6) आधारशिवाय रजिस्ट्रेशन होणार नाही.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button