कृषी बातम्या

‘ या ‘ सुगंधित गवतापासून शेतकऱ्यांना मिळेल,हेक्‍टरी दीड लाख रुपयापर्यंत भरघोस उत्पन्न….

From this fragrant grass, farmers will get a huge income of up to Rs 1.5 lakh per hectare

गुजरात मध्ये शक्यतो पारंपारिक पद्धतीने पिके घेतली जातात. त्यामध्ये भात, गहू, बटाटा, कपाशी, तसेच भाजीपाला ही पारंपारिक त्यांची लागवड केली जाते. पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. कधी नैसर्गिक आपत्ती म्हणजे अवकाळी पाऊस तर बरेचदा वन्य-जीव यांच्या कडून देखील शेती मध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. तसेच दिवसेंदिवस जमिनीची सुपीकता देखील कमी होत चालली आहे

पारंपारिक शेतीमध्ये खर्चाचे प्रमाण देखील अधिक असते या सगळ्या समस्यांना मार्ग काढण्यासाठी काही प्रगतिशील शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांचा शोध लावला आहे. त्या वेळी त्यांच्या असे लक्षात आले की ‘जमरोशा ‘ किंवा स्थानिक भागात या वनस्पतीला ‘रोशागवत’ नावाच्या वनस्पती पासून सुगंधी तेल निर्माण केले जाऊ शकते. विशेषतः ज्या जमिनीची सुपीकता कमी आहे त्यामध्ये रोशा गवत, लेमन ग्रास,’ पाल्मरोसा ‘अशी सुगंधित गवताची चांगल्या प्रकारे वाढ होते. त्यामुळे या सुगंधित गवताचे उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिक पसंती दिली.

या सुगंधित गवताचा उपयोग सुगंधी तेल उत्पादनासाठी करण्यात येतो त्याचबरोबर या गवतामुळे जमिनीचा पोत देखील सुधारतो.

आर्थिक गणिताचा विचार केल्यास, ‘ पाल्मरोसा ‘ लागवडीतून साधारणपणे 1.5 लाख रुपये प्रति हेक्टर उत्पन्न मिळत आहेत. ‘जमरोशा ‘ या वनस्पतीच्या लागवडीतून साधारणपणे1.59 लाख रुपये प्रति हेक्‍टर उत्पन्न मिळत आहे.उत्पन्ना बरोबरच शेत जमिनीचा पोत देखील सुधारत आहे.

📌 या सुगंधित गवताच्या उत्पादनामुळे सिंचनाचे पाणी कमी प्रमाणात लागते. तसेच मजुरांची आवश्यकता कमी प्रमाणात झाली आहे म्हणजेच पाणी आणि पैसा यामध्ये बचत होते.

📌 सुगंधित गवतापासून तेल काढल्यानंतर खाली राहिलेल्या अवशेष उपयोग इंधन व जनावरांचा चारा म्हणून करू शकतो.

📌 या पिकांची साठवणूक पद्धत देखील सोपे असते तसेच या वनस्पतीमुळे जनावरांना कोणताही त्रास होत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button