कृषी बातम्या

Milk Rates | दुधाच्या दरात कपात: दुष्काळ आणि वाढत्या खर्चामुळे दूध उत्पादकांवर दुहेरी संकट!

Milk Rates | खाजगी दूध संघांनी एक रुपया प्रति लीटर दरात कपात केल्याने शेतकरी संघर्ष समिती आक्रमक

उन्हाळ्यात दूध उत्पादनात घट आणि वाढत्या मागणीमुळे दर वाढण्याची अपेक्षा असतानाच खाजगी दूध संघांनी एक रुपया प्रति लीटर दरात (Lifestyle) कपात केल्याने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. आधीच दुष्काळ आणि चारा-पाण्याच्या टंचाईमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर ही कपात दुहेरी संकटापेक्षा कमी नाही.

दुध उत्पादनात घट आणि वाढीव खर्च

यंदाच्या दुष्काळामुळे चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादनात घट झाली आहे. याचबरोबर, जनावरांना होणाऱ्या आजारांमुळे उत्पादन खर्चात (Lifestyle of farmer) वाढ झाली आहे. या परिस्थितीत खाजगी दूध संघांनी केलेली दरातील कपात शेतकऱ्यांसाठी आर्थिक डोंगूरच आहे.

Market Rates | कांद्याच्या दरात चढ-उतार, काही बाजारपेठेत भाव 30 रुपये प्रति किलोपर्यंत!

दूध उत्पादकांना ५ रुपये प्रति लीटर अनुदान : अटींमुळे वंचित

राज्य सरकारने ५ रुपये प्रति लीटर अनुदान देण्याची घोषणा केली असली तरी, अटींमुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. वेळेवर माहिती अपलोड न केल्याने अनेक शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळू शकला नाही.

दुध उत्पादक संघटनांचा आक्रमक पवित्रा

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी खाजगी दूध संघांच्या मनमानी कारभारावर तीव्र टीका केली आहे. त्यांनी तात्काळ दरात वाढ करण्याची आणि ५ रुपये प्रति लीटर अनुदानात अडथळे दूर करण्याची मागणी केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सरकारकडून त्वरित हस्तक्षेप आवश्यक

दुष्काळ आणि वाढत्या खर्चामुळे आधीच अडचणीत असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना (lifestyle) दरातील कपामुळे मोठा फटका बसला आहे. या गंभीर परिस्थितीत राज्य सरकारने त्वरित हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. दूध उत्पादनाचा व्यवसाय टिकून राहण्यासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button