इतर

वेळीच सावधान व्हा !! मोदी सरकार 3 महिन्यांसाठी 100 मिलियन युजर्सला मोफत इंटरनेट देत आहे. हा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईल वर आला आहे का?

Be careful in time !! The Modi government is giving free internet to 100 million users for 3 months. Have you received this message on your mobile?


मोदी सरकारद्वारा ( Indian Government) ऑनलाईन शिक्षणासाठी( Online Education) 10 कोटी युजर्सना 3 महिन्यांचा रिचार्ज प्लॅन फ्री अशा आशयाचा मेसेज व्हाट्सअप द्वारे ( WhatsApp) प्रसारीत करण्यात आला आहे. मेसेज च्या पुढे असे लिहिले आहे, जर तुमच्याकडे जिओ, एअरटेल किंवा वोडाफोन-आयडियाचं कंपन्यांचे सिम कार्ड असेल , तर वापरकर्त्याला या योजनेचा फायदा मिळणार आहे.

लोकांना विश्वास पटण्यासाठी त्या व्यक्तीने पुढे स्वत: ला हा फ्री रिचार्ज मिळाला असून बाकीच्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे नमूद करण्यात आले आहे. हा व्हाट्सअप मेसेज सोशल मीडियावर हा मसेज तुफान व्हायरल होत आहे. या मेसेजखाली एक लिंकही देण्यात आली आहे आणि त्या लिंकवर क्लिक करुन रिचार्ज मिळवता येईल असा दावाही त्या व्यक्तीने केला आहे. तसेच ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे असे देखील सांगण्यात आला आहे.

हा तुमच्यासाठी फ्रॉड अलर्ट आहे,( Fraud Alert) म्हणजेच वेळेत सावधान व्हा, भारत सरकारने अशी कोणतीही स्कीम किंवा घोषणा अजून पर्यंत केली नाही त्यामुळे हा दावा खोटा आहे. दिलेले लिंगच्या आधारे कदाचित तुमच्याकडून नकळत व्यक्तिगत माहिती सुद्धा घेऊ शकतात त्यातून कालांतराने फ्रॉड घडू शकतो त्यासाठी वेळेत जागृत व्हा.

व्हायरल होणाऱ्या मेसेजसोबत( Message) दिलेल्या कोणत्याही लिंकवर अजिबात क्लिक करू नका. त्यातून कदाचित मोठे नुकसान होऊ शकेल मोबाईल तंत्रज्ञान हे मानवासाठी जितके उपयुक्त आहे, तितकेच त्याला जपुन हाताळण्याची देखील गरज आहे दिवसेंदिवस सायबर गुन्हे देखील वाढत चालले आहेत. मॅसेज ची शहानिशा करून करून जपून पावले टाकत जा नाहीतर मोठे आर्थिक नुकसान होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button