हवामान

Weather News | महाराष्ट्रात ८ ते १० जूनपर्यंत मान्सूनचा आगमन, काही भागात मुसळधार पावसाची शक्यता!

Weather News | मुंबई: राज्यात हवामान बदलाचा तीव्र अनुभव येत आहे. काही भागात उष्णतेची लाट तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. केरळमध्ये मान्सून आगमन झाले असून, महाराष्ट्रात ८ ते १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ मामिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस मुंबईसह कोकणात ढगाळ वातावरणसह दमट उष्णता राहणार आहे.

राज्यात काही भागात मुसळधार पाऊस:

  • ३ जून ते १० जून या कालावधीत सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ आणि गडचिरोली या ९ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
  • उर्वरित २७ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  • मुंबईसह कोकणात ढगाळ वातावरणसह पुढील तीन दिवस दमट उष्णतेचा अनुभव येणार आहे.

हेही वाचा:Health Tips | साखर : गोड पदार्थ की आरोग्याचा धोका?

मान्सून कर्नाटक किनारपट्टीवर:

  • येत्या चार ते पाच दिवसात मान्सून कदाचित कर्नाटक किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे.
  • त्यानंतर त्याची प्रगती कदाचित धिम्या गतीने होईल.
  • ‘रेमल’ चक्रीवादळाच्या अवशेषामुळे मान्सून सरासरी तारखेच्या दोन दिवस अगोदर केरळात पोहोचला असला तरी, महाराष्ट्रात तो सरासरीच्याच तारखेला म्हणजे मुंबईत १० जून दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी सल्ला:

  • सध्याच्या वातावरणीय स्थितीनुसार, शेतकऱ्यांनी खरीप पेर तयारीसाठी शेतमशागत आणि पेरणीसाठी जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत (२० जून) वाट पाहणे गरजेचे आहे.
  • पेरणीसाठी योग्य वेळ पाहूनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी.
  • धूळ-पेरणी किंवा बाठर ओलीवर पेरणी टाळावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button