यावर्षी जवळपास सर्वच वस्तू महागल्या आहेत या आठवड्यात मात्र हिरव्या मिरचीच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले हे दर वाढमागील कारण म्हणजे यावर्षी मिरची उत्पादनामध्ये तुटवडा असल्यामुळे त्याचा परिणामी मिरचीच्या आवकेत घट झाली आहे. साधारणपणे या आठवड्यामध्ये नाशिकमध्ये मिरचीला प्रति क्विंटल 3000 ते 4900 पर्यंत पर्यंत दर मिळाला. सध्या बाजारपेठेमध्ये हिरव्या मिरचीची मागणी असल्यामुळे बाजार भावांमध्ये सुधारणा झाली आहे असे बाजार समितीच्या सूत्रांनी कडून माहिती देण्यात आली.
या आठवड्यामध्ये फळभाज्यांची आवक सर्वसाधारणपणे स्थिर आहे तसेच फळभाज्यांचे दर देखील स्थिर आहेत. चला तर पाहुयात भाजीपाल्याचे दर
( भाजीपाल्याचे दर किमान व कमाल असे आहेत)
- कोथिंबीर = 700-4850 *मेथी = 1500 – 3400
- शेपू = 1000- 3000 *कांदा पात = 400- 2600
चला पाहू या फळांचे या आठवड्यातील दर
केळी = 800 – 1250
- डाळिंब = 500- 9000
- आंबा = 15000- 30000
( हे बाजार भाव नाशिक मधील कृषी उत्पन्न बाजार समितीतील आहेत)