ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
यशोगाथा

Success Story | आयआयटी पासून पोल्ट्री फार्मपर्यंत! शेतकऱ्यांचा हक्क जपणारा हा तरुण उद्योजक वाचा कशी करतोय कमाल!

Success Story | आयआयटी पासून शिक्षण घेतल्यानंतर एका चांगल्या नोकरीवर स्थिर होणे हे अनेक तरुणांसाठी स्वप्न असते. पण काही तरुण असेही असतात जे यापेक्षा अधिक करायचे स्वप्न पाहतात. अशाच एका तरुणाने इंजिनियरिंगची नोकरी सोडून हैदराबादमध्ये देशी कोंबड्यांचा व्यवसाय सुरु केला आहे.

या तरुणाचे नाव साकेश गौर आहे. या तरुणाने कंट्री चिकन कंपनीची स्थापना केली आहे. साकेश गौर यांनी IIT मधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यानंतर एका टेक कंपनीत 28 लाख रुपयांच्या पॅकेजवर नोकरी करू लागले. (Success Story ) पण त्याला स्वतःचे काहीतरी वेगळे काम करायचे होते. त्यासाठी तो संधी शोधत होता.

साकेश गौर यांना हेंबर रेड्डी आणि मोहम्मद समीउद्दीन या दोन तरुणांची साथ मिळाली. हेंबर रेड्डी यांना कुक्कुटपालन व्यवसाय करायचा होता आणि त्याबाबत माहिती गोळा करत होते. यावेळी त्याची गौर आणि समुद्दीन यांची भेट झाली. यानंतर या तिघांनी कुक्कुटपालन व्यवसायाऐवजी मोठ्या प्रमाणावर कोंबडी विक्रीचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

वाचा : Success Story | नाद करा पण शेतकऱ्यांचा कुठं! सुशिक्षित तरुणाने व्यवसाय सोडून सुरू केली डाळिंब शेती, आता वर्षाला करतोय लाखोंची कमाई

साकेश गौर आणि त्यांच्या मित्रांनी हैदराबादमधील कुकटपल्ली आणि प्रगतीनगर येथे भारतातील पहिले देसी चिकन रेस्टॉरंट उघडले. या रेस्टॉरंटमध्ये ते पारंपारिक पद्धतीने तयार केलेले देशी चिकन देतात. या रेस्टॉरंटमध्ये त्यांनी 70 लोकांना काम दिले आहे.

साकेश गौर यांच्या गटाने दक्षिणेकडील राज्यातील 15,000 पोल्ट्री उत्पादकांशी संपर्क साधला आणि त्यांनी स्थानिक कोंबडीची पिल्ले शेतकऱ्यांकडून बाजारभावाने खरेदी करण्यास सुरुवात केली. यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे आणि त्यांना आर्थिक फायदा होत आहे.

साकेश गौर यांच्या या व्यवसायाची लोकप्रियता वाढत आहे. त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये दररोज हजारो लोक येतात. यामुळे साकेश गौर यांना मोठ्या प्रमाणात नफा होत आहे.

साकेश गौर यांचे म्हणणे आहे की, “देशी कोंबडीचे मांस हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये भरपूर प्रथिने आणि पोषक तत्त्वे असतात. आमच्या कंपनीचा उद्देश देशी कोंबडीचे मांस लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.”

साकेश गौर यांच्या या उपक्रमाने देशी कोंबड्यांसाठी नवीन बाजारपेठ निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे आणि लोकांना आरोग्यदायी मांस मिळत आहे.

Web Title | Success Story | From IIT to Poultry Farm! Read how this young entrepreneur who protects the rights of farmers is doing great!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button