यशोगाथा

Success Story | शेतकऱ्याच्या मुलाने MPSC त झेंडावला! वाचा कोल्हापूरच्या विनायकची यशोगाथा..

Success Story | A farmer's son cleared the MPSC! Read the success story of Vinayak of Kolhapur..

Success Story | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) घेतलेल्या राज्यसेवा (मुख्य) परीक्षा 2022चा निकाल गुरुवारी जाहीर झाला. (Success Story) या परीक्षेत ग्रामीण भागातील मुलाने राज्यात बाजी मारली. कोल्हापूर जिल्ह्यातील विनायक नंदकुमार पाटील यांनी 622 गुण पटकावून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.

मुलींमध्ये पूजा वंजारी हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर मागासवर्गीय प्रवर्गातून धनंजय बांगर राज्यातून पहिला आला आहे.

राज्यात धनंजय बांगर (608) हा दुसरा आला. तर सौरभ गावंदे (608) याने तिसरा क्रमांक मिळवला. गणेश दत्तात्रय दिघे (605) चौथा तर शुभम गणपती पाटील (603) आला.

उपजिल्हाधिकारी, डिवायएसपी आणि तहसीलदार या संवर्गातील 623 जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात आली होती. 18 जानेवारी 2023 गुरुवारी परीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत झाली होती. त्याच दिवशी काही तासातच अंतिम निकाल जारी करण्यात आला.

वाचा | Onion Powder Project | कांद्याची भुकटी करणारा स्मार्ट प्रकल्प, आर्थिक चिंता दूर करणार – कृषी मंत्री

शेतकऱ्याच्या मुलाचे यश

कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथे राहणाऱ्या विनायक पाटील याने परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला. त्याला 622 गुण मिळाले तर धनंजय बांगर 608 गुणांसह राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुलींमध्ये पहिली आलेली पूजा वंजारी हिला 570 गुण मिळाले.

विनायक पाटील यांचे वडील शेती करतात. त्यांनी राज्यसेवेच्या दुसरा प्रयत्नात हे उल्लेखनीय यश मिळवले. पहिल्या प्रयत्नातून उपशिक्षणाधिकारी पदासाठी त्यांची निवड झाली होती. त्याचे शिक्षण पुणे येथील फर्ग्रसन महाविद्यालयात झाले. संख्याशास्त्र विषयात त्यांनी पदवी मिळवली.

त्यांच्या या यशानंतर त्यांच्या गावात जल्लोष करण्यात आला. त्यांच्या कुटुंबातील सदस्य, मित्र-मैत्रिणी आणि गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.

विनायक पाटील यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा मिळाली आहे. त्यांचे हे यश राज्यसेवा परीक्षा देणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी प्रेरणादायी आहे.

Web Title | Success Story | A farmer’s son cleared the MPSC! Read the success story of Vinayak of Kolhapur..

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button