ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Maratha Reservation | मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य, मराठा बांधवांनी केली जल्लोषात स्वागत

Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. या निर्णयाचे मराठा समाजात उत्साहाचे वातावरण आहे.

आज मनोज जरांगे यांनी सरकारच्या शिष्टमंडळासोबत बैठक केली. (Maratha Reservation) या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर चर्चा झाली. या बैठकीत मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या.

या निर्णयाची माहिती देत मंत्री दीपक केसरकर म्हणाले, “मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मनोज जरांगे पाटील हे संवेदनशील आहेत. ते महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतील. आता मागण्या तर मान्य झाल्या. पण, त्याची अमंलबजावणी ही शासकीय विहीत नियम असतात त्याप्रमाणे होत असते. पंरतु महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे की, आत्तापर्यंत आपण ३७ लाख कुणबी प्रमाणपत्र देऊ शकलो. आता ही नवी प्रकिया पुर्ण केल्यानंतर ही संख्या ५० लाखांच्या वरती जाणार आहे. त्यामुळे हा न्याय मिळवण्यामध्ये मनोज जरांगेंची भूमिका आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो.”

वाचा | Virtual Reality For Cows |व्हर्च्युअल रियालिटी तंत्रज्ञान; गाय-म्हशी यांना ठेवा आनंदात आणि वाढवा दूध चे उत्पादन..

मनोज जरांगे यांनी आज वाशी येथील शिवाजी चौकात मराठा बांधवांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सरकारच्या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी मराठा बांधवांना संबोधित करताना म्हटले, “आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. हा आमच्यासाठी मोठा विजय आहे. हा विजय आपण सर्वांनी मिळवला आहे. या विजयाचे आपण सर्वांनी जल्लोषात स्वागत करावे.”

मनोज जरांगे यांच्या निर्णयाचे मराठा समाजात उत्साहाचे वातावरण आहे. मराठा बांधवांनी जल्लोषात मनोज जरांगे यांचे स्वागत केले आहे.

Web Title | Maratha Reservation | Accepting all the demands of Manoj Jarange, the Maratha brothers welcomed him with jubilation

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button