ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Success Story | बापरे ! आयआयटी ग्रॅज्युएटची देशी चिकन कंपनी ; महिन्याला तब्बल एक कोटीची कमाई, वाचा सविस्तर …

Success Story | Father! IIT Graduate's Desi Chicken Company; Earning as much as one crore per month, read in detail...

Success Story | तेलंगणा येथील आयआयटी ग्रॅज्युएट सैकेश गौंड यांनी देशी चिकन विक्रीचा व्यवसाय उभा केला आहे. त्यांना महिन्याला एक कोटी रुपयांची कमाई होत आहे. आज त्यांच्याकडे (Success Story ) स्वतःचा प्रसिद्ध चिकन ब्रँड असून ते यशस्वी उद्योजक आहेत.

सैकेश गौंड यांनी वाराणसी आयआयटीतून मॅकेनिकल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन केले. त्यांनी नोकरीची ऑफर मिळाली, परंतु त्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा होता. त्यांनी कोंबडी पालनाचा व्यवसाय करणाऱ्या हेमाम्बर रेड्डी या व्यक्तीशी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी रिटेल मीट मार्केटमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला.

गौंड यांच्या व्यवसायाला एका इन्क्युबेशन प्रोग्रॅमने मोठी मदत केली. हैदराबादच्या आयसीएआर नॅशनल मीट रिसर्च इन्स्टीट्यूटने त्यांना हायजेनिक प्रोसेसिंग आणि रिटेलिंग युनिट आणि गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टीसेसची स्थापणेसाठी मदत केली.

वाचा : Weather Update | अरबी समुद्रात दोन चक्रीवादळांचा धोका ; जाणून घ्या कोणकोणत्या राज्यांना बसणार फटका,जाणून घ्या लगेच ?

सैकेश गौंड, हेमाम्बर रेड्डी आणि मो.सामी उद्दीन यांनी मिळून कंट्री चिकन कंपनीची स्थापना केली. त्यांनी देशी कोंबड्यांची चांगली चव, दर्जेदार प्रोडक्शन आणि न्युट्रिशन व्हॅल्यूमुळे खूपच प्रसिद्धी मिळाली.

कंपनीने हैदराबादच्या प्रगतीनगर आणि कुकटपल्ली विभागात मित्रांच्या मदतीने देशातील पहिला ऑथेन्टिक देशी चिकन सेंटर उघडले. या आऊटलेटमध्ये 70 हून अधिक लोकांना नोकरी दिली. दक्षिणेकडील राज्यात कंपनीने 15 हजार पोल्ट्री शेतकऱ्यांचे नेटवर्क तयार केले.

कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 5 कोटी उत्पन्न मिळवले. जाने.2022 मध्ये 3 लाख प्रति महिना ते एप्रिल 2023 मध्ये 1.2 कोटी प्रति महिना महसूल मिळवित आहे. पुढच्या आर्थिक वर्षांत 50 कोटी महसूल मिळविण्याचा कंपनीचा इरादा आहे.

हेही वाचा :

Web Title : Success Story | Father! IIT Graduate’s Desi Chicken Company; Earning as much as one crore per month, read in detail…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button