कृषी तंत्रज्ञान

आयआयटी संशोधक संशोधन करण्यास आले पुढे; शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करणार, वाचा सविस्तर..

IIT researchers came forward to do research; Will develop new technology for farmers, read more ..

अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपयोगी तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री विकसित करण्यासाठी आयआयटीच्या संशोधकांनी पुढे यायला हवे. असे कृषिमंत्री (Minister of Agriculture) दादाजी भुसे म्हणाले तसेच शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून राज्य शासन नवनवीन प्रयोग राबविले जात आहेत. शेतकरी स्वतःच्या कल्पनेने नवीन उपक्रम राबवत असतोच सोबत नवीन तंत्रज्ञानाचा देखील फायदा होईल. आपण पाहतो अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कृषी विभागाचे (Department of Agriculture) प्रयत्न सुरूच असतात. तरी कृषी मंत्र्यांनी अवाहन केले आहे की शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल व निविष्ठा खर्चात कपात होईल, असे तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री विकसित करण्यावर आयआयटीने भर द्यायला हवा.

वाचा : रुफटॉप सौर योजना यंत्रणेवर 40 टक्के अनुदान; वीज ग्राहकांना कसा घेता येईल लाभ? वाचा सविस्तर..

कृषी विभाग-आयआयटी करणार संशोधन –

शेतकरी आपल्या स्वतःच्या कल्पनेतून नवनवीन प्रयोग करून शेतामध्ये अधिक उत्पन्न (income) काढत असतो. तसेच कल्पनेने वेगवेगळ्या प्रकारची पिके घेत असतो. यांच्या सोबत नवीन तंत्रज्ञानाचा (New Technology) वापर करता यावा. अल्पभूधारक शेतकऱ्याला पाठबळ मिळावे. तांत्रिक व शासकीय पध्दतीचा आधार मिळावा यासाठी कृषी मंत्री दादाजी भिसे यांनी आयआयटी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाबाबत संशोधन करण्यास सांगितले आहे. नवीन तंत्रज्ञान (Technology) विकसित करण्यास सांगितले आहे. कृषी विभाग व आयआयटी संशोधन (IIT research) विद्यार्थी एकत्र येऊन याचा आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. आयआयटी मध्ये संशोधन (IIT research) करणारे विद्यार्थी राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांचे उत्तर शोधण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहेत.

वाचा : रुफटॉप सौर योजना यंत्रणेवर 40 टक्के अनुदान; वीज ग्राहकांना कसा घेता येईल लाभ? वाचा सविस्तर..

आयआयटीला कृषी मंत्र्यांची भेट –
कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आयआयटी (IIT) मुंबई येथे भेट देण्यास गेले. आयआयटी मधील संशोधनाचा शेतीच्या समस्या सोडविण्यासाठी उपयोग होईल यामुळे शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा फायदा होईल, असा विचार कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं. आयआयटी संशोधन (IIT research) करून शेतकऱ्यांना काहीतरी फायदा होईल यासाठी संशोधन सुरू करणार आहेत. कृषी विभागासोबत काम करायला आनंद होईल असे सांगितले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button