ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
यशोगाथा

Sugarcane Management | कागलच्या शेतकऱ्याचा नादचखुळा! फक्त एकाचं एकरात घेतलं १२० टन ऊस उत्पादन, जाणून घ्या कसं केलं व्यवस्थापन?

Sugarcane Management | कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील म्हाकवे येथील युवा शेतकरी सतीश ऊर्फ सिद्राम तुकाराम पाटील यांनी माळरानावर एकरी १२० टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन (Sugarcane Management) घेऊन विक्रम केला आहे. .कृषी पदविकाधारक असलेले सतीश यांनी नोकरीच्या मागे न जाता घरच्या शेतीकडे (Agriculture ) लक्ष दिले आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे यश मिळवले आहे.

कशी केली लागवड?
फेब्रुवारी २०२३ मध्ये ट्रॅक्टरच्या एका फाळी पलटीच्या सहाय्याने नांगरट केले.

 • मे महिन्यात पाच ट्रॉली शेणखत आणि १५ टन कंपोस्ट खत टाकून पुन्हा नांगरट केले.
 • २ जून २०२३ रोजी पाणी देऊन वाफसा आल्यानंतर कुदळीने दीड फूट अंतरावर को-८६००३२ जातीच्या उसाची एक डोळा पद्धतीने लागण केली.
 • तीन महिन्यांनंतर भरणी केली.

खत व्यवस्थापन:

 • रासायनिक खतांचे सहा डोस देण्यात आले.
 • जीवाणू खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, संजीवके यांच्या वेळोवेळी फवारण्या घेण्यात आल्या.

उत्पादन आणि खर्च:

 • एकरी १२० टन ऊस उत्पादन मिळालं.
 • मशागत, कम्पोस्ट, शेणखत यांसह रासायनिक खते फवारणीसाठी एकरी एक लाख १५ हजार रुपये खर्च आला.
 • खर्च वजा जाता दोन लाख ९३ हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळालं.

पुढील योजना

 • सतीश यांनी पुढील वर्षासाठी एकरी १४० टन ऊस उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करण्याचं ठरवलं आहे.
  सतीश यांच्या यशाबद्दल कृषी तज्ञ आणि शेतकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. सतीश यांच्या यशामुळे इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button