ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
यशोगाथा

Agricultural Research | शेतकरी पुत्राची कमाल! पिकाला पेरणीनंतर दीड-दोन महिने पाण्याची काळजीच मिटवली; केलं ‘हे’ जबरदस्त संशोधन

Maximum of the farmer's son! Care is taken to water the crop one and a half to two months after sowing; Did 'this' tremendous research

Agricultural Research | पिकाची पेरणी करताच सर्वप्रथम त्याला पाणी द्यावे लागते. मग ते पिकाची काढणी होईपर्यंत त्याला पाणी हे द्यावेच लागते. परंतु अनेकदा पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके जळतात. परंतु आता शेतकऱ्यांना पेरणीनंतर तब्बल दीड ते दोन महिने पिकाला पाणी देण्याची गरजच पडणार नाही. जळगाव जिल्ह्यातील एका तरुणाने हे संशोधन केले आहे. चला तर मग जाणून घेऊया या तरुणाने नेमकं काय संशोधन केला आहे.

पेरणीनंतर पिकाला दीड-दोन महिने पाण्याची गरज संपली
शेतकरी मित्रांनो
जळगाव जिल्ह्यातील सुनील पवार नावाच्या मेकॅनिकल इंजिनीयरने पिकाला पेरणीनंतर दीड ते दोन महिने पाण्याची गरज लागणार नाही अशा प्रकारचे संशोधन केले आहे. या तरुणाने विशिष्ट प्रकारची जैविक पावडर उत्पादित केली आहे. ही जैविक पावडर पेरणी करताना बियाण्यामध्ये मिसळल्यास पिकाला पेरणीनंतर तब्बल दीड ते दोन महिने पाणी देण्याची गरज भासत नाही.

Success Story | नादचखुळा! MBA पास तरुणाने गावात सुरू केला कडकनाथ कोंबडीचा व्यवसाय, आता करतोय लाखांत कमाई

कृषिमंत्र्यांनी घेतली दखल
सुनील पवार या तरुणाने या पावडरचा शोध लावल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. ऐन पेरणीनंतर पिकाला पाणी नसल्यास दीड ते दोन महिने पाणी देण्याची काळजी शेतकऱ्यांना राहणार नाही. इतकंच नाहीतर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील या तरुणाच्या संशोधनाची दखल घेतली आहे. त्याचबरोबर पाण्याबाबत कमकुवत असलेला मराठवाडा विभाग यासाठी हे संशोधन वरदान ठरणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Maximum of the farmer’s son! Care is taken to water the crop one and a half to two months after sowing; Did ‘this’ tremendous research

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button