ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Seed Subsidy | शेतकऱ्यांना ‘या’ योजनेंतर्गत बी-बियाण्यांसाठी मिळणार 50 टक्के अनुदान, ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, मूग, उडीद अशा विविध प्रकारच्या तेलबिया कडधान्ये देण्यात येणार आहेत. तर अन्नधान्य, कडधान्यांचे शेतीत (Agriculture) लागवडीकरता अनुदानावर तेल बियाण्याचे वाटप केलं जाते

Seeds Subsidy | याच अनुदानावरील बियाण्याच्या वाटपाचा (Seed Distribution) लाभ घेण्यासाठी ऑनलाईन (Online Application) पद्धतीने अर्ज करावा लागतो. राज्य शासनाच्या (State government) माध्यमातून शासनाच्या केंद्र शासनाच्या (Central Government) माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या या अनुदानाच्या लाभासाठीही तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या (MahaDBT Farmer Scheme) माध्यमातून अर्ज करावा लागेल. या बियाण्याच्या लाभासाठी देखील फार्मर स्किमच्या माध्यमातून अर्ज करावा लागेल. चला तर मग याबाबत ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

योजेअंतर्गत खालील जिल्ह्यांना ‘या’ पिकांच्या बियान्यांसाठी मिळणार अनुदान:
राअसुअ भरडधान्य (मका)– सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे व जळगाव (एकूण ७ जिल्हे)
राअसुअ गहू– सोलापूर, बीड, नागपूर (३ जिल्हे)
राअसुअ पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल)– ज्वारी, बाजरी, रागी (एकूण २६ जिल्हे)
राअसुअ भात– नाशिक, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली (८ जिल्हे)
राअसुअ कडधान्य – सर्व जिल्हे

वाचा: Agriculture | कृषी यांत्रिकीकरणासाठी तब्बल 240 कोटींची मान्यता, शेतकऱ्यांना मिळणारं ‘या’ अवजारांसाठी अनुदान

बाजरी– नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद (एकूण ११ जिल्हे)
ज्वारी– नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ (एकूण २३ जिल्हे)
ऊस– (औरंगाबाद विभाग) – औरंगाबाद, जालना, बीड.
कापूस– (अमरावती विभाग) – अमरावती, वाशिम, बुलढाणा,अकोला, यवतमाळ.
(नागपूर विभाग) – वर्धा,नागपूर,चंद्रपूर.
रागी– ठाणे (पालघर सह), नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड व रत्नागिरी. (एकूण ७ जिल्हे)
(लातूर विभाग) – उस्मानाबाद,नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली.

Eligibility | राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत बियाणे वितरण योजनेसाठी आवश्यक पात्रता काय?
• शेतकरी तांदूळ, गहू, डाळी,कापूस,ऊस याअंतर्गत येत असलेल्या कोणत्याही पिकासाठी अर्ज करत असेल, तर दिलेले जिल्हेच त्यासाठी अनिवार्य राहतील.
• कोणत्याही बाबीसाठी फक्त एकाच योजनेतून अनुदान देय आहे.
• शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
• जर लाभार्थ्याला गळीतधान्य पिके यामधून लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांच्या शेतात गळीतधान्य पिके असणे आवश्यक आहे आणि जर लाभार्थ्याला
• वृक्षजन्य तेलबिया पिके यामधून लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांच्या शेतात तेलबिया पिके असणे आवश्यक आहे.
• संबंधीत शेतक-याचे स्वतःचे नावे 7/12 व 8/अ उतारा असणे बंधनकारक राहील.

Documents | आवश्यक असणारी कागदपत्रे

  • 7/12 प्रमाणपत्र
  • 8-अ प्रमाणपत्र
  • खरेदी करण्याचे साधन / उपकरणांचे कोटेशन (पंप, पाईप, शेततळे या घटकांकरीता)
  • केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त एजन्सीचे चाचणी प्रमाणपत्र (पंप घटकासाठी)
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थींसाठी जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  • हमीपत्र
  • पूर्वसंमती पत्र

वाचा: Central Government Scheme | शेतकऱ्यांनो कर्ज हवंय? तर घ्या केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत पाहिजे तेवढं कर्ज

बियाणे अनुदान योजनेचा भरा ऑनलाईन अर्ज
बियाणे अनुदान योजना संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. या संदर्भात अर्ज भरण्यासाठी तुम्ही कॉम्प्युटर सेंटरमध्ये जाऊ शकता. अर्जाची पोच पावती घेऊ शकता. Maha- DBT लिंकवर क्लिक करून या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकता. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आपण यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेले असेल आपल्या प्रोफाईल बनवलेला असेल तर आपण महाडीबीटीवर फॉर्मर भरू शकता. तुम्हाला सर्वप्रथम आपली प्रोफाईल बनवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला महाडीबीटीवर फॉर्मरवर (mahaDBT) ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. ऑनलाईन अर्ज ओपन केल्यानंतर तेथे तुम्हाला सर्व माहिती भरावी लागेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button