ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Shasan Aaplya Dari | अवघ्या काही रुपयांत मिळणार हवा तो दाखला ! महा ई सेवा केंद्र आणि सेतू वर असणार प्रशासनाचे लक्ष …

Shasan Aaplya Dari |शेतकऱ्यांना विविध सरकारी कागदपत्रांची आवश्यकता असते. जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रावर ही कागदपत्रे काढून मिळतात. दरम्यान बऱ्याच जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रांची मुदत व मुदतवाढ संपल्याने त्यासाठी आता नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे. मात्र २५ मेपासून अकरावी प्रवेशाला (11th admissions) सुरवात होईल. यावेळी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने नवीन मोहीम हाती घेतली आहे.

‘शासन आपल्या दारी’ मोहीम (Shasan Aaplya Dari)

‘शासन आपल्या दारी’ ही विशेष मोहीम प्रशासनाने सुरू केली आहे. याअंतर्गत ग्राहकांना पाच मिनिटे ते एक तासात दाखला देण्याची सोय केली आहे. यामुळे विद्यार्थी व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून सर्व प्रकारची कागदपत्रे एकाच ठिकाणी काढून मिळणार आहेत.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

आपले सरकार सेवा केंद्र

दरम्यान आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, वंशावळीचे प्रतिज्ञापत्र, दगड खाणपट्टा परवाना, अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र, पत दाखला, जन्म व मृत्यू दाखला, मिळकत प्रमाणपत्र, वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, गौणखनिज परवाना, वारसा प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, सांस्कृतिक कार्यक्रम परवाना, खडी क्रशर परवाना, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, भूमिहीन शेतमजूर, नवीन रेशनकार्ड, दुबार रेशनकार्ड, शिधापत्रिकेत वाढ किंवा नावे कमी करणे, विभक्त शिधापत्रिका असे अनेक दाखले दिले जातात.

निश्चित केलेल्या दरातच मिळणार दाखले

या दाखल्यांसाठी काही दरही निश्चित केलेले आहेत. या निश्चित केलेल्या दरातच महा-ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी दाखले द्यावेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अकरावी प्रवेशाला सुरवात होण्यापूर्वीच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सर्व दाखले एकाच ठिकाणी मिळावेत, यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत जिल्हाभर विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायतीतील आपले सरकार सेवा केंद्रे व महा-ई-सेवा केंद्रांमधूनही ‘सेतू’च्या दरातच दाखले देण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती सोलापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली आहे.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

दाखल्यांसाठीचे दर

१) ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र – ३३.६० रुपये

२) वंशावळीचे प्रतिज्ञापत्र- ३३.६० रुपये

३) अल्पभूधारक प्रतिज्ञापत्र – ३३.६० रुपये

४) अधिवास प्रमाणपत्र- ३३.६० रुपये

५)मृत्यू दाखला- ३३.६० रुपये

६) जातीचा दाखला- ५७.६० रुपये

७) नॉन क्रिमीलेअर- ५७.६० रुपये

८)नवीन रेशनकार्ड – ३३.६० रुपये

९) विभक्त रेशनकार्ड-३३.६० रुपये

Farmers will get all important documents in less price

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button