ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Monsoon | दिलासादायक ! राज्यात लवकरच मान्सून होणार दाखल ; जाणून घ्या तारखा

राज्यात सध्या शेतीच्या कामांना वेग आला असून शेतकरी वर्ग मान्सूनकडे डोळे लावून बसला आहे. अशातच शेतकऱ्यांसाठी मान्सून (Monsoon) संदर्भात एक दिलासादायक अपडेट समोर येत आहे. नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून यंदा निर्धारित वेळेत अंदमानमध्ये दाखल झाला आहे. पुढील आठवड्यात केरळमध्ये मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. याच गतीने मॉन्सूनचा प्रवास कायम राहिल्यास येत्या १५ ते २० जूनच्या दरम्यान विदर्भात (Vidarbh) मान्सूनचे आगमन होऊ शकते.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

केरळनंतर महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार

भारतीय हवामान विभागाने मान्सून संदर्भात दिलेल्या माहितीनुसार, १९ मे ला मॉन्सूनने अंदमान व निकोबार बेटात प्रवेश केला आहे. यानंतर मान्सूनने केरळच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे. याच वेगाने मॉन्सूनने आपली प्रगती कायम ठेवल्यास येत्या चार जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये (Kerala) दाखल होऊ शकतो. केरळनंतर मॉन्सून कोकणमार्गे महाराष्ट्राच्या सीमेत दाखल होणार आहे.

या तारखेला विदर्भात मान्सूनचे आगमन होणार

मान्सूनला केरळमधून विदर्भात यायला किमान दोन आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यात प्रवासामध्ये कोणताही अडथळा न आल्यास येत्या १५ ते २० जूनच्या दरम्यान मान्सून विदर्भात दाखल होईल. असा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान मध्येच अडथळा आल्यास मान्सूनला थोडा उशीरही होऊ शकतो. असे प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

मान्सूनच्या आधी अवकाळी पावसाची शक्यता

विदर्भामध्ये मागच्या दहा वर्षातील विदर्भाच्या मॉन्सूनच्या इतिहासावर नजर टाकल्यास लक्षात येते की, तीन-चार वर्षांचा अपवाद वगळता मॉन्सूनचे वेळेत आगमन झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मॉन्सूनच्या अगोदर विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज आहे. परंतु एप्रिल व मे महिन्यातील अवकाळी पाऊसाचा मान्सूनवर विपरित परिणाम होणार नाही.

Dates of monsoon in maharashtra

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button