ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

New Honda SUV | होंडा लाँच करणार नवीन कार ! कमी पैशात जास्त सुविधा देणाऱ्या या गाडीबद्दल एकदा वाचाच

New Honda SUV|मागील अनेक वर्षांपासून होंडा भारतीयांना नवनवीन गाड्यांची सेवा देत आहे. आता खूप मोठ्या कालावधीनंतर होंडाकडून भारतीय बाजारपेठेत नवीन एसयूव्ही लाँच करण्यात येणार आहे. लाँचिंग पूर्वीच
ही मिड साइज एसयूव्ही चांगलीच चर्चेत आहे. होंडा कंपनीच्या या नव्या एसयूव्हीचं नाव होंडा एलिव्हेट (Honda Elevate) असे आहे. ही एसयूव्ही भारतात येत्या ६ जूनला लाँच होणार आहे.

गाडीचे बुकिंगही झाले सुरू

भारतामध्ये ही गाडी लाँच होण्यापूर्वीच तिचे बुकिंग सुरू झाले आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, होंडा डीलरशिप असणाऱ्यांकडे एलिव्हेटचं बुकिंग ११ हजार ते २१ हजार रुपयांपर्यंत टोकन रक्कम घेऊन घेतले जात आहे. भारतामध्ये या गाडीची स्पर्धा हुंडाई क्रेटा, मारुती ग्रँड व्हिटारा, टोयोटा अर्बन क्रुझर, टाटा हॅरियर आणि किया सेल्टोस या कारशी असणार आहे.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

असे असणार इंजिन

नवीन उत्सर्जन नियमांमुळे होंडा कंपनीने त्यांची भारतातील सर्व डिझेल मॉडेल्स बंद केली आहेत. यामुळे पेट्रोल व्यतिरिक्त, डिझेल इंजिनमध्येदेखील एलिव्हेट आणली जाण्याची शक्यता कमी आहे. होंडा कंपनी या गाडीमध्ये त्यांचं नवीन हायब्रीड इंजिन वापरू शकते. हे इंजिन होंडा सिटीचं १.५ लिटर पेट्रोल-हायब्रीड इंजिन सारखं असेल.

गाडीची शोरूम किंमत

होंडाचे हे हायब्रीड चांगले मायलेज देते. हे इंजिन सिटी सेडानमध्ये २७.१३ kmpl चे मायलेज देते, तर एलिव्हेट गाडीत २५ kmpl मायलेज देते. ही गाडी होंडा तिच्या जुन्या एसयूव्हीप्रमाणे फ्रंट व्हील ड्राइव्ह (FWD) प्रणालीमध्ये लाँच करू शकते. दरम्यान होंडा एलिव्हेट एसयूव्ही फीचर्सच्या बाबतीत सिटी सेडान
सारखीच प्रगत असणार आहे. तसेच एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत ११ ते १२ लाख रुपये असण्याचा अंदाज आहे.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

Features | होंडा एलिव्हेट एसयूव्हीची वैशिष्ट्ये

१) कंपनी या गाडीमध्ये सिंगल-पेन सनरूफ देत आहे.
२) एसयूव्हीमध्ये वायरलेस कनेक्टिव्हिटी, अॅम्बियन्स लायटिंग, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, वायरलेस चार्जिंग, व्हॉईस असिस्टंट सपोर्ट या सोयी असतील.
३)डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, लार्ज इन्फोटेनमेंट डिस्प्ले, रिअर एसी व्हेंट्स आणि प्रीमियम ऑडिओ सिस्टम यांसारखे विकसित वैशिष्ट्ये गाडीमध्ये असतील. ४)कंपनी या गाडीसोबत अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) फीचर देईल अशी शक्यता आहे.

Honda company going to launch new SUV cars

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button