ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Tomato Rate | टोमॅटोला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी संतप्त ! बाजारसमिती मध्येच टोमॅटो फेकून निषेध केला व्यक्त

Tomato Rate | शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळण्यासाठी कायम झगडावे लागते. सध्या टोमॅटोच्या (Tomato) बाबतीत शेतकऱ्यांची तीच अवस्था आहे. शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेल्या टोमॅटोला अवघा दोन रुपये किलो तर प्रति क्रेट ४० ते ६० रुपये दर मिळत आहे. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. दरम्यान नाशिक बाजार समितीमध्ये (Nashik Market Yard) शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्येच टोमॅटो ओतून निषेध व्यक्त केला आहे.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

उत्पादन खर्च मिळणेसुद्धा झाले अवघड

टोमॅटोला सध्या मिळत असलेल्या दरातून शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चसुद्धा ( Trasnport expenditure) वसूल होत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांवर बाजार समितीमध्येच टोमॅटो ओतून देण्याची वेळ आल्याने विरोधकांकडून सरकारच्या धोरणावर टीका होत आहे. अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल यामुळे पिकांसाठी औषधाचा खर्च वाढला आहे. त्यामध्ये शेतामध्ये लागणारी मजुरी व वाहतुकीचा खर्च मिळून सुद्धा शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळालेला नाही. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

म्हणून दरात झाली घसरण

नाशिक बाजार समितीमधून मुख्यतः गुजरात, पंजाब, राजस्थान, बंगळुरू आणि दिल्लीला माल जातो. मात्र तेथून येणारी मागणी घटल्याने टोमॅटोची निर्यात (Tomato Export) बंद झाली आहे. तर दुसरीकडे बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक वाढल्याने दारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड केली

मागच्यावर्षी टोमॅटोला उच्चांकी दर (Highest Rate)होता. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली. यामुळे बाजारात टोमॅटोची आवक वाढली आहे. याचवेळी परराज्यातून टोमॅटोसाठी असलेली मागणी सुद्धा घटली आहे. त्यामुळे बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या टोमॅटोला प्रति कॅरेट (२० किलो) ४० ते ६० रुपये दर मिळत आहे.

Farmers get hipered due to low tomato rates

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button