ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Online Ration Card | आता रेशनकार्ड काढता येणार ऑनलाइन पद्धतीने ; एजंटला पैसे देण्याची आणि कार्यालये फिरण्याची कटकट मिटली !

Online Ration Card |सरकारी कामे करायची म्हणजे सामान्य माणसाच्या अंगावर काटा येतो. कारण सरकार कामांत बऱ्याच अडचणी येतात. साधे रेशन कार्ड काढायचे म्हंटले तरी लोकांना सरकारी कार्यालयाच्या भरपूर फेऱ्या माराव्या लागतात. त्यातसुद्धा एजंटांना पैसे खाऊ घालावे लागतात, तेव्हा रेशन कार्ड मिळते.

सामान्य लोकांचा त्रास होणार कमी

यामुळेच रेशन कार्यालयांमधून एजंटांनी एक व्यवसाय उभा केला आहे. दरम्यान आता याच एजंटांच्या मनमानीला लगाम मिळणार आहे. आता रेशन कार्ड ऑनलाइन ( Online Ration Card) आणि नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे सामान्य लोकांचा त्रास कमी होणार आहे.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

ऑनलाइन आणि नि:शुल्क रेशन कार्ड

रेशनकार्ड साठी राज्यातील अनेक तहसील व परिमंडळ कार्यालयांमध्ये एजंटांचा सुळसुळाट होता. यामध्ये अनेक अधिकारीसुद्धा सामील होते. यामुळे सामान्यांना अवघ्या वीस रुपयांत मिळणाऱ्या रेशन कार्डासाठी दोन हजार रुपये मोजावे लागत होते. मात्र आता हे सर्व बंद होणार आहे. राज्य सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार आता सामान्य लोकांना ऑनलाइन आणि नि:शुल्क रेशन कार्ड काढता येणार आहे.

ऑनलाइन अर्ज केल्यानंतर होणार ही प्रक्रिया

रेशनकार्ड साठी ऑनलाइन अर्ज (Online Application) केल्यानंतर त्याबाबतची माहिती संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकडे जमा होणार आहे. यामध्ये रेशनकार्ड साठी अर्ज करणारा अर्जदार नेमका कुठल्या वर्गातील आहे, यावरून त्याचे रेशन कार्ड किती दिवसांत मिळेल हे ठरणार आहे. अर्जदार अंत्योदय योजनेतील किंवा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (National food security scheme) असल्यास पूर्वीप्रमाणेच रेशन अधिकारी त्याच्या कुटुंबाचा सर्व्हे ( Family Survey) करणार आहेत.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

एवढ्या दिवसांत मिळणार रेशनकार्ड

अंत्योदय योजनेतील किंवा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमधील रेशन कार्ड देताना २० दिवसांची मुदत लागणार आहे. तर पांढऱ्या रेशन कार्डासाठी सात दिवस लागणार आहेत. रेशन कार्ड एकदा मान्य झाले की, ते ऑनलाइनच डाउनलोड करता येईल. कार्ड कोणत्या दुकानदाराकडे देण्यात आले आहे याचा उल्लेखही यामध्ये करण्यात येणार आहे.

Online ration card will be benificial for people

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button