ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Micro Solar Pump | अमेरिकन व्यक्तींचा भारतीय शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात ; तयार केला मायक्रो सोलार पंप ! वीजबिलही येणार कमी

Micro Solar Pump |भारतात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. यामुळे देशाची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. देशातील कोट्यवधी शेतकरी शेती हा व्यवसाय करतात. यामुळे भारत हा कृषीप्रधान देश म्हटला जातो. म्हणूनच सरकार शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करत असते. तसेच विविध सामजिक संस्था देखील शेतकऱ्यांसाठी काम करतात.

विजेच्या बिलात मोठी बचत होणार आहे

या संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपयोगी पडणारे संशोधन केले जात आहे. सध्या असे एक संशोधन समोर आले आहे. मागील सात वर्षांपासून पुणे शहरात राहत असणाऱ्या दोन अमेरिकन व्यक्तींनी शेतकऱ्यांसाठी मायक्रो सोलर पंप तयार केला आहे. या मायक्रो पंपमुळे शेतकऱ्यांच्या विजेच्या बिलात मोठी बचत होणार आहे.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

अमेरिकेन व्यक्तींनी भारतीय शेतकऱ्यांसाठी स्टार्टअप सुरु

कॅटी टेलर आणि व्हिक्टर लेस्नीवस्की या दोघांनी खेतवर्क (Khethworks) नावाने स्टार्टअप सुरु केले. MIT मध्ये शिक्षण घेत असताना हे दोघेही मास्टर पदवीच्या माध्यमातून टाटा ट्रस्टसोबत काम करत होते. यावेळी त्यांनी भारतीय शेतकऱ्यांसाठी स्टार्टअप सुरु केले. महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांसाठी काम करण्यापूर्वी त्यांनी ते ओडिशा आणि झारखंडमधील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या.

मायक्रो सोलर पंप

यावेळी त्यांच्या लक्षात आले की बहुतांश शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणीपुरवठा करताना विजेची समस्या निर्माण होत आहे. यावर विचार करताना त्यांना मायक्रो सोलार पंपाची कल्पना सुचली. त्यानंतर या दोघांनी प्रकल्पावर काम सुरू करून फंडीग जमा केले. तसेच भारत सरकारकडून मायक्रो सोलर पंपचा आरखडा मंजूर करून पेटेंट घेतले व पंप तयार करण्यासाठी पुणे शहरात युनिट उभे केले.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

९०० शेतकऱ्यांना मायक्रो सोलर पंपचे वाटप

खेतवर्क्सने या स्टार्टअपने आतापर्यंत ९०० शेतकऱ्यांना मायक्रो सोलर पंपचे वाटप केले आहे. हा पंप मायक्रो असल्याने तो रोज शेतात घेऊन जाणे शेतकऱ्यांसाठी सोपे झाले आहे. यामुळे सोलार पंपची चोरी होत नाही. या पंपामुळे शेतकऱ्यांचे वर्षातील दहा ते बारा हजार रुपये विजेचे बील वाचणार आहे. देशातील अनेक शेतकरी या पंपचा वापर सुरू केला आहे.

Two americans invented micro solar pump for indian farmers

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button