ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Agricultural Advice | शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरचं करावी पेरणी! अन्यथा दुबार पेरणीच येऊ शकतं संकट, जाणून घ्या कृषी सल्ला

Agricultural Advice | भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस दिनांक 1 ते 5 जुलै दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 1, 2 आणि 3 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. दिनांक 4 व 5 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. दिनांक 1 व 2 जुलै रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. चला तर मग कृषी सल्ला (Agricultural Advice) जाणून घेऊयात.

वाचावाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

कृषी सल्ला

शेतकरी बांधवांनी पेरणीयोग्य (75 ते 100 मिमी) पाऊस झाला नसल्याने अपुऱ्या ओलाव्याच्या परिस्थितीमध्ये पेरणीची घाई करू नये.

  • शेतकरी बांधवांनी मान्सून 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच वाफसा अवस्थेत पेरणी करावी.
  • पेरणीयोग्य उपलब्ध ओलाव्याची खात्री करून कोरडवाहू कपाशीची लागवड 30 जूनपर्यंत करावी.
  • सोयाबीनची पेरणी 7 जुलैपर्यंत, खरीप तीळ पेरणी 7 जुलैपर्यंत, खरीप ज्वारीची पेरणी 10 जुलैपर्यंत, मकाची पेरणी 7 जुलैपर्यंत, मुग पेरणी 30 जून पर्यंत वाफसा अवस्थेत करावी.
  • पुढील २ दिवसविजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्याव इतर पाळीव जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे.
  • जनावरे हे खुल्या पाण्याचे स्त्रोत, नदी किंवा तलाव व ट्रॅक्टर व इतरधातूच्या अवजारांपासून दूर ठेवावे.
  • स्थानिक हवामान अंदाज व सूचना यांचा अंदाज घेऊनच शेती कामाचे नियोजन करावे. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता,शेतकरी व शेतमजूर यांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Web Title: Farmers should sow after the sowing rains! Otherwise there may be a crisis of re-sowing, know agricultural advice

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button