ताज्या बातम्या

Crop Insurance Scam | अरे बाप रे! ‘या’ जिल्ह्यात रब्बी पिक विमा घोटाळा? पेरणीपेक्षा जवळपास दुप्पट विमा भरला, अर्ज बाद होण्याची शक्यता…

Crop Insurance Scam | Oh father! 'Ya' Rabbi Pick Insurance Scam? Almost twice the insurance paid than sowing, the application is likely to be rejected...

Crop Insurance Scam | कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या मूळ जिल्ह्यात आता रब्बी हंगामातही बोगस पिक विमा भरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासकीय नोंदीत असलेल्या पेरणी क्षेत्रापेक्षा कित्येक पटीने जास्त (Crop Insurance Scam) पिक विमा भरला गेल्याने या घोटाळ्याचा संशय व्यक्त होत आहे.

बीड जिल्ह्यात खरिपा हंगामात शेतकऱ्यांनी लाखोंच्या संख्येने बोगस पिक विमा भरल्याचे प्रकरण अद्याप ताजे असतानाच रब्बी हंगामातही हीच परिस्थिती दिसून येत आहे. खरिपाबाबत ठोस कारवाई न झाल्याने रब्बीमध्येही हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

शासकीय नोंदीवर प्रश्नचिन्ह

कृषी विभागाच्या अधिकृत नोंदीनुसार, बीड जिल्ह्यात रब्बी हंगामात एकूण 3 लाख 32 हजार 353 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र, आतापर्यंत तब्बल 5 लाख 74 हजार 39 हेक्टर पिकांचा विमा भरला गेला आहे. हे आकडे पाहता, पेरणीपेक्षा जास्त पिक विमा भरला गेल्याचे स्पष्ट होत आहे.

काळीमा फासण्याची मागणी

हा प्रकार समोर आल्यानंतर आता पुन्हा एकदा बोगस पिक विमा घोटाळ्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कृषी पंडित आणि विरोधी पक्ष या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

वाचा : Land Records Department | वारस नोंदी, मयताचे नाव कमी करणे, बोजा चढविणे, कमी करणे यासारख्या जमीन-संपत्तीच्या फेरफारी ऑनलाईन..

बीडमध्ये हा प्रकार नवीन नाही

बीड जिल्ह्यात हा प्रकार नवीन नाही. यापूर्वीही अनेकदा बोगस पिक विमा भरल्याच्या प्रकरणांचा उल्लेख झाला आहे. मात्र, या घोटाळ्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळत नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती दयनीय होत आहे.

सरकारने लक्ष देणे गरजेचे

या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने बोगस पिक विमा घोटाळ्याला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. शासनने या घोटाळ्यावर कसून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच, पीडित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा, या घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल आणि त्यांचे जीवनमान आणखी खालावेल.

Web Title : Crop Insurance Scam | Oh father! ‘Ya’ Rabbi Pick Insurance Scam? Almost twice the insurance paid than sowing, the application is likely to be rejected…

हेही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button