कृषी बातम्या

महत्त्वाचे; पीक विमा भरला आहे? तर त्यानंतर करा ही प्रक्रिया, अन्यथा मिळणार नाही पीक विमा..

शेतकरी पीक विमा (Farmers Crop Insurance) भरल्यानंतर नुकसानभरपाई ची वाट पाहत असतात. खरीप हंगामात सर्वात महत्वाचे पीक म्हणजे सोयाबीन पीक आणि खरीप हंगामात (In the kharif season) सर्वात जास्त सोयाबीन पिकाचा पेरा होता. ज्यावेळी सोयाबीन पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली त्यावेळी च विमा साठी शेतकऱ्यांनी कंपनीला रक्कम दिली. पीक विमा (Crop insurance) रक्कम भरल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे पाहूया सविस्तरपणे..

फक्त पीक विमा भरून नुकसान भरपाई मिळणार नाही –

फक्त विमा विमा रक्कम (Farmers Crop Insurance)-भरून नुकसान भरपाई मिळेल असे होणार नाही तर शेतकऱ्यांना जर नुकसान भरपाई रक्कम पदरात पडायची असेल तर त्यासाठी तुम्हाला पिकाचे नुकसान झाले की त्याच्या ७२ तासाच्या आत तुम्हाला पीक नुकसान संबंधित माहिती क्रॉप इन्शुरन्स (Crop insurance) या ऍप वर नोंद करावी लागणार आहे. ज्यावेळी तुम्ही नोंद कराल त्यानंतर तुमच्या तक्रार घेऊन पीक विमा कंपनीचे जे कर्मचारी आहेत ते तुमच्या शेतात पीक पाहण्यासाठी तुमच्या शेताकडे येणार आणि नंतर तुमच्या खात्यावर रक्कम येणार.

वाचा: शेतकऱ्यांनो घरी बसून 72 तासांच्या आत नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्या; ती कशी? वाचा सविस्तर..

प्रक्रिया:-

पीक विमा (Crop insurance) भरलेल्या शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स या अँपवर आपल्या पिकासोबत झालेल्या नुकसान संबंधित माहिती भरा. त्यामध्ये पिकाचे नाव तसेच पिकाचे क्षेत्र, मालकाचे नाव, गट नंबर आणि पेरा किती क्षेत्रावर होता इ. सर्व माहिती भरावी लागणार आहे.

तालुका मध्ये 1 कर्मचारी नेमण्यात आला:-

शेतकरी पीक विमा (Farmers Crop Insurance) भरत असूनही अधिकारी याकडे पाठ फिरवत आहेत त्यामुळे विमा कंपनीचा तालुक्याला १ कर्मचारी नेमण्यात आलेल्या आहे. कर्मचाऱ्याला सर्व पिके माहीत नसल्याने ऑनलाईन पद्धतीचा (Online method) मार्ग कंपनीने काढलेला आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीचा मार्ग शेतकऱ्यांना माहीत नसल्याने या मध्ये माहिती अशी भरायची वगैरे ही समस्या सगळीकडे उपलब्ध झालेली आहे.

वाचा :कोकण, गोवा, मराठवाडासह “या” ठिकाणी पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस..

वाचा : मोठी बातमी: इलेक्ट्रीक वाहन धोरण अनुदान लागू; पहा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?

यावर्षी शेतकऱ्यांचे नुकसान:-

खरीप हंगामात अगदी शेवटच्या टप्यात पावसाने अवकृपा केली त्यामुळे अनेक शेतकरी वर्गाने पीक विमा (Crop insurance) भरलेला होता आणि शेतकरी मदतीची वाट पाहत बसले होते. मात्र शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारे कशी माहिती भरायची ते समजले नसल्याने ऑनलाईन पद्धतीने (online method) ते माहिती नोंदवू शकले नाहीत आणि याच कारणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले परंतु पीक विमा कंपन्या फायद्यात राहिल्या.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button