Drought Situation Review | राज्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे पथक दाखल; जाणून घ्या सविस्तर …
Drought Situation Review | To review the drought situation in the state, know the details of the central team filing...
Drought Situation Review | राज्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने पाठविलेले पथक (ता. १२) राज्यात दाखल होणार आहे. पथकात केंद्रीय कृषी सहसचिव प्रिय रंजन यांच्यासह १२ अधिकारी आहेत.
पथकाचा अहवाल केंद्रीय मंत्री समितीसमोर ठेवला जाईल. (Drought Situation Review) दुष्काळाला तोंड देण्यासाठी राज्याला नेमकी किती मदत करायची, याची शिफारस या समितीकडून केंद्रीय कॅबिनेटला केली जाईल. कॅबिनेटच्या मंजुरीनंतर राज्याला मदतीचे वितरण होईल.
दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) या दोन घटकांपासून मदत देता येते. दुष्काळ निवारण व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय यंत्रणेने तयार केलेल्या आहेत. त्यानुसार दुष्काळग्रस्त राज्यात आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथक पाठविण्याची तरतूद आहे.
राज्याने केंद्राला यापूर्वी पाठविलेल्या अहवालात दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत १५ जिल्ह्यांची नावे दिलेली आहेत. यातील २४ तालुक्यांमध्ये तीव्र तर १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे. यातील काही तालुक्यांना केंद्रीय पथक भेट देईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
वाचा : Ban on Ethanol | साखरेचा तुटवडा टाळण्यासाठी इथेनॉलवर बंदी! ऊस उत्पादक शेतऱ्यांसाठी महत्वाची बातमी; वाचा सविस्तर…
केंद्राच्या पथकात असलेले अधिकारी खालीलप्रमाणे आहेत:
- केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सहसचिव प्रिय रंजन
- केंद्रीय कृषी मंत्रालयाचे अवर सचिव के. मनोज
- केंद्रीय खर्च विभागाचे सहसंचालक जगदीश साहू
- नीती आयोगाचे संशोधन अधिकारी शिवचरण मीना
- केंद्रीय पेयजल व स्वच्छता खात्याचे अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरन
- केंद्रीय जलस्रोत विभागाच्या संनियंत्रण व मूल्यमापन संचालनालयाचे संचालक हरीश उंबरजे
- केंद्रीय ग्रामीण खात्याच्या प्रशिक्षण विभागाचे उपसचिव प्रदीप
- केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे अवर सचिव संगीत कुमार
- केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सहआयुक्त डॉ. एच. आर. खन्ना
- कापूस विकास संचालनालयाचे संचालक डॉ. ए. एल. वाघमारे
- पुसा येथील महालनोबिस राष्ट्रीय पीक हवामान केंद्राचे उपसंचालक डॉ. सुनील दुबे
- केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचे सल्लागार चिराग भाटिया
राज्यातील दुष्काळाची स्थिती
राज्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. २४ तालुक्यांमध्ये तीव्र तर १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे. या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पेरणी न झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
केंद्रीय पथकाच्या दौऱ्याकडे राज्याचे डोळे लागून आहेत. पथक दुष्काळग्रस्त भागात जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेईल. त्यानंतर केंद्र सरकार दुष्काळग्रस्त राज्यांना मदत देईल.
Web Title : Drought Situation Review | To review the drought situation in the state, know the details of the central team filing…
हेही वाचा :