Land Records Department | वारस नोंदी, मयताचे नाव कमी करणे, बोजा चढविणे, कमी करणे यासारख्या जमीन-संपत्तीच्या फेरफारी ऑनलाईन..
Land Records Department | Land-property manipulations such as heir registration, reduction of deceased's name, encumbrance, reduction etc. online.
Land Records Department | महाराष्ट्र सरकारच्या भूमि अभिलेख विभागाने एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे, ज्यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Land Records Department) आता फेरफारविषयक सेवा महा-ई-सेवा, सेतू आणि आपले सरकार यासारख्या सर्वसामान्यांसाठी सुलभ असलेल्या केंद्रांमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे या सेवांसाठी तलाठी कार्यालयात जाण्याची नागरिकांची गरज पूर्णपणे संपणार आहे.
या सुविधेमुळे वारस नोंदी, मयताचे नाव कमी करणे, बोजा चढविणे, कमी करणे इत्यादी स्वरूपाच्या अर्जांसाठी तलाठी कार्यालयाची धावपळ करण्याची गरज राहणार नाही. यापुढे नागरिकांना फक्त महा-ई-सेवा, सेतू किंवा आपले सरकार केंद्रांमध्ये जाऊन अर्ज करावा लागेल. अर्जासह फक्त एक कागदपत्र स्कॅन करून अपलोड करण्याची आवश्यकता असून यासाठी केवळ २५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. अधिक कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता भासल्यास प्रत्येक कागदपत्रासाठी केवळ २ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
वाचा : Bank Job | तरुणांसाठी बँकेत नोकरीची सुवर्ण संधी! 5 हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज मागवले!
यासोबतच अर्ज करताना नागरिकांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक दिला तर प्रक्रियेदरम्यान प्रत्येक टप्प्यावरील माहिती एसएमएसद्वारे मिळत राहणार आहे, त्यामुळे अर्ज प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ होणार आहे.
भूमि अभिलेख विभागाच्या या क्रांतिकारी निर्णयामुळे राज्यातील लाखो नागरिकांना वेळ आणि पैसा दोन्हीही वाचणार आहे. या निर्णयाचे स्वागत करताना भूमि अभिलेख विभागाने सर्व नागरिकांना या सुलभ सुविधाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
या निर्णयाचे लाभ:
- नागरिकांना फेरफारविषयक सेवांसाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही.
- वेळ आणि पैसा दोन्हीही वाचणार आहे.
- सेवांचा लाभ घेण्याची प्रक्रिया सोपी, सुलभ आणि पारदर्शक आहे.
या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या जीवनात सुधारणा होणार आहे.
Web Title : Land Records Department | Land-property manipulations such as heir registration, reduction of deceased’s name, encumbrance, reduction etc. online.
हेही वाचा