योजना

Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम रक्कमचे वाटप सुरू; त्वरित तपासा तुमचा जिल्हा

Good news for farmers! Allotment of advance amount under Pradhan Mantri Crop Bima Yojana started; Check your district immediately

Crop Insurance | राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील (Crop Insurance) अग्रीम रक्कमचे वाटप सुरू झाले आहे. राज्यात आतापर्यंत 47 लाख 63 हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून 1 हजार 954 कोटी रुपये वाटप होणार आहेत. यापैकी आतापर्यंत 965 कोटी रक्कम वितरित करण्यात आली असून उर्वरित रक्कम वितरणाचे काम प्रगतीपथावर आहे.

24 जिल्ह्यांसाठी अधिसूचना
खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसानीसंदर्भात एकंदरीत 24 जिल्ह्यांसाठी अधिसूचना काढण्यात आली होती. आता 12 जिल्ह्यांमध्ये या अधिसूचनेवर विमा कंपन्यांचे कोणतेही आक्षेप नसून 9 जिल्ह्यांमध्ये अंशत: आक्षेप आहेत. राज्य स्तरावर सध्या बीड, बुलढाणा, वाशिम, नंदूरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, अमरावती अशा 9 जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांच्या आक्षेपावर अपील सुनावणी सुरु असून पुणे आणि अमरावती वगळता इतर ठिकाणची सुनावणी संपली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नोंदणी
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत
1 कोटी 70 लाख 67 हजार अर्जदारांनी नोंदणी केली असून केवळ 1 रुपयात राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा दिला आहे. यासाठी एकूण 8 हजार 16 कोटी रुपये विमा हप्ता द्यावा लागणार असून 3 हजार 50 कोटी 19 लाख रुपये असा पहिला हप्ता देण्यात आला आहे.

वाचा : Cabinet Decision | राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार! शेतकऱ्यांसह सामान्यांनो जाणून घ्या तुमच्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला का?

रब्बी हंगामात पेरणीची प्रगती
राज्यात 31 ऑक्टोबर अखेरपर्यंत सरासरीच्या 86 टक्के पाऊस (928.8 मि.मी.) झाला आहे. रब्बीसाठी 58 लाख 76 हजार हेक्टर पेरणीचे नियोजन असून आत्तापर्यंत 28 टक्के पेरणी झाली आहे. सध्या जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पेरणी मंदावली आहे. गतवर्षी याच सुमारास 13 लाख 50 हेक्टर पेरणी झाली होती. या वर्षी 15 लाख 11 हेक्टर पेरणी झाली आहे. रब्बी हंगामात ज्वारी हे महत्त्वाचे पीक असून 17 लाख 53 हजार हेक्टर क्षेत्र आहे. सध्या सरासरीच्या 45 टक्के ज्वारीची पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे क्षेत्र 21.52 लाख हेक्टर असून यावर्षी 5.64 लाख हेक्टर म्हणजेच सरासरीच्या 26 टक्के पेरणी झाली आहे.

शेतकऱ्यांना मिळणारी अग्रीम रक्कम
शेतकऱ्यांना मिळणारी अग्रीम रक्कम ही सरासरी नुकसानीच्या 60 टक्के इतकी असते. जर नुकसानीची टक्केवारी 60 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर, शेतकऱ्यांना उर्वरित नुकसानीची रक्कम पिकाच्या काढणीनंतर मिळते.

शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम कशी मिळेल?
शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम मिळवण्यासाठी त्यांना विमा कंपनीच्या कार्यालयात अर्ज करणे आवश्यक आहे. या अर्जात शेतकऱ्याला नुकसानीची माहिती द्यावी लागते. विमा कंपनी शेतकऱ्याच्या नुकसानीची पाहणी करून त्याला अग्रीम रक्कम देते.

हेही वाचा :

Web Title: Good news for farmers! Allotment of advance amount under Pradhan Mantri Crop Bima Yojana started; Check your district immediately

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button