ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! खरिप हंगामासाठी केवळ एका रुपयात मिळणारं पिक विमा, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यासाठी कोणत्या कंपनीकडून मिळणार?

शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा ( Crop insurance for farmers for one rupee ) पिक विमा योनेअंतर्गत जिल्हे आणि राबवणारी विमा कंपनी ( Districts and implementing insurance company under PIC Bima Yona )

Crop Insurance | भारत हा कृषिप्रधान देश असून येथे शेतकऱ्यांसाठी विविध शासकीय योजना राबवल्या जातात. परंतू अचानक येणाऱ्या अवकाळी पाऊस तसेच, विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानास आर्थिक सहाय्य म्हणून केंद्र शासनाच्या माध्यमातून पंतप्रधान पिक विमा योजना (Pradhan Mantri Pik Bima Yojana) राबवली जात आहे. आता राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा (Crop Insurance) मिळणार आहे.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा


केंद्र शासनाने 13 जानेवारी 2016 रोजी प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू केली आहे. ही योजना 2023-24 या चालू वर्षामध्ये बीड पॅटर्न (80:110) आधारित राबवण्यात येत आहे. या पिक विमा योजनेअंतर्गत विमा कंपनी शेतीची होणाऱ्या नुकसान भरपाई 110 टक्क्यांपर्यंत देणार आणि उर्वरित नुकसान भरपाई ही राज्य शासन देणार आहे. आता शेतकऱ्यांना खरिप हंगामासाठी केवळ एक रुपयात पिक विमा मिळणार आहे. या पिक विमा योजनेअंतर्गततांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, कांदा, कारळे, कापूस इत्यादी पिकांचा समावेश आहे.

पिक विमा योनेअंतर्गत जिल्हे आणि राबवणारी विमा कंपनी

  • भारतीय कृषी विमा कंपनी: वाशीम, बुलडाणा, सांगली, नंदुरबार, बीड
  • आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी: परभणी,वर्धा, नागपूर
  • ओरिएटल इन्शुरन्स कंपनी: नगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा
  • एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी: हिंगोली, उस्मानाबाद, अकोला, धुळे, पुणे,
  • युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी: नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
  • चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी: औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड
  • युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी: जालना , गोंदिया, कोल्हापूर
  • रिलायंइन्स जनरल इन्शुरन्स कंपनी: यवतमाळ, अमरावती, गडचिरोली
    एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी: लातूर

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

खरीप हंगामातील पिक विमा रक्कम (प्रति हेक्टर)

  • भात: 40,000 ते 51,760
  • ज्वारी: 20,000 ते 32,500
  • बाजरी: 18,000 ते 33,913
  • नाचणी: 13,750 ते 20,000
  • तूर: 25,000 ते 36,802
  • मूग: 20,000 ते 25,817
  • मका: 6,000 ते 35,598
    •vउडीद: 20,000 ते 26,025
    •vभुईमूग: 29,000 ते 42,971
  • सोयाबीन: 31,250 ते 57,267
  • तीळ: 22,000 ते 25,000
  • कांदा: 46,000 ते 81,422
  • कारळे: 13,750
  • कापूस: 23,000 ते 59,983

दरम्यान, पिक विमा योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत साधारण 22,629 कोटींची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. सदर पीक विमा योजना ही भारतीय कृषी विमा कंपनी (AIC) या विमा कंपनी अंतर्गत राबवली जात आहे.

हेही वाचा:

Web Title: Good news for farmers! Crop insurance for Kharip season in just one rupee, know which company will get it for your district?

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button