ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यात पुढचे चार दिवस जोरदार पावसाची शक्यता, जाणून घ्या कधी करावी पेरणी?

भारतीय हवामान अंदाजानुसार, पुढील पाच दिवस दिनांक 21 ते 25 जून दरम्यान आकाश आंशिक ते अंशतः
ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक 25, 26, 27 व 28 जून रोजी सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा
पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. दिनांक 24, 25 व 26 जून 2023 रोजी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा
पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन पिकाची लागवड कधी करावी? हे जाणून घेऊयात.

कृषी सल्ला

भारतीय हवामान विभागाच्या दैनंदिन पर्जन्यमान निरीक्षण प्रणाली च्या अहवालानुसार पेरणीयोग्य (75 ते 100 मिमी) पाऊस झाला नसल्याने पेरणीची घाई करू नये, शेतकरी बांधवांनी 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच वाफसा अवस्थेत पेरणी करावी.

सोयाबीनसोयाबीन पेरणी मान्सून च्या आगमनानंतर व 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच करावी. बियाणे

पेरणीपूर्वी उगवण चाचणी करून उपलब्ध सोयाबीन बियाण्याच्या गुणवत्तेची खात्री करावी, पेरणीसाठी
योग्य रोपांची संख्या सध्या करण्यासाठी उगवण क्षमता 70% असावी. शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी प्रती हेक्टरी 10 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा 2.5 टन कोंबकों डी खत जमिनीत मिसळावे. शेतकरी
बांधवांनी सोयाबीन लागवडीसाठी रुंद वरंबा सरी किंवा सरी वरंबा तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. या
पद्धतीमध्ये शेतात पाणी साचून राहणार नाही तसेच पावसाच्या खंड असलेल्या काळात पिक व्यवस्थापन
करण्यात मदत होईल. सोयाबीन पेरणीसाठी शिफारशीमध्ये दोन ओळीतील अंतर 45 सेंमी तर दोन रोपांतील अंतर 10 सेंमी ठेवावे व पेरणी ही 2 ते 3 सेंमी खोलीवर करावी.

सोयाबीन पेरणी मान्सून च्या आगमनानंतर व 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच करावी. बियाणे
पेरणीपूर्वी उगवण चाचणी करून उपलब्ध सोयाबीन बियाण्याच्या गुणवत्तेची खात्री करावी, पेरणीसाठी
योग्य रोपांची संख्या सध्या करण्यासाठी उगवण क्षमता 70% असावी. शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी प्रती हेक्टरी 10 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा 2.5 टन कोंबकों डी खत जमिनीत मिसळावे. शेतकरी
बांधवांनी सोयाबीन लागवडीसाठी रुंद वरंबा सरी किंवा सरी वरंबा तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. या
पद्धतीमध्ये शेतात पाणी साचून राहणार नाही तसेच पावसाच्या खंड असलेल्या काळात पिक व्यवस्थापन
करण्यात मदत होईल. सोयाबीन पेरणीसाठी शिफारशीमध्ये दोन ओळीतील अंतर 45 सेंमी तर दोन रोपांतील अंतर 10 सेंमी ठेवावे व पेरणी ही 2 ते 3 सेंमी खोलीवर करावी.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

कपाशी

कपाशीची पेरणी मान्सूनचा 75 ते 100 मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी
कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम
उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता
त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंड अळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती
आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे.

भात

घरचे बियाणे वापरायचे असल्यास त्याची उगवण शक्ती घरीच तपासून घ्यावी व 70 ते 80% च्या वर
उगवणशक्ती असल्यास ते बियाणे पेरणीसाठी वापरावे तसेच त्या अनुषंगाने बियाण्याचे प्रमाण ठेवावे. पूर्व विदर्भासाठी शिफारस केलेल्या भात वाणांचाच लागवडीसाठी वापर करावा. पेरणीपूर्वी धान बियाण्यास बीज प्रक्रिया करावी.

तूर

तूर पेरणी 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच करावी. जमिनीमध्ये पेरणीयोग्य उपलब्ध
ओलावा नसल्यास पेरणी टाळावी. पेरणीपूर्वी तुरीच्या बियाण्यास कार्बोक्सीन 37.5 % + थायरम 37.5% डीएस या पुर्वमिश्रीत बुरशीनाशकाची 3 ग्राम प्रती किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

मुग

मुग पेरणी 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतर करावी. मूग पिकाच्या लागवडीसाठी पिकेव्ही मूग-8802, पिकेव्ही ग्रीनगोल्ड (एकेएम 9911) या वाणाची निवड करावी.

उडी

उडीद पेरणी 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतर करावी. उडीद पिकाच्या लागवडीकरिता टीएयु-1, टीएयु-2, पिकेव्ही उडीद-15 आणि पिकेव्ही ब्लॅकगोल्ड या वाणाची निवड करावी.

Web Title: Important news for farmers! Chance of heavy rain for the next four days in the state, know when to sow?

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button