ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Agricultural Advisory | अर्रर्र..! राज्याला बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका! शेतकऱ्यांनो नुकसानीपूर्वीचं जाणून घ्या तज्ञांचा कृषी सल्ला

Agricultural Advisory | भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार,
पुढील पाच दिवस दिनांक 14 ते 18 जून दरम्यान आकाश आंशिक ढगाळ (Agricultural Advisory) राहण्याची शक्यता आहे. 14,
15, 16, 17 आणि 18 जून रोजी तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह
मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची अधिक
शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची (Agricultural Advisory) कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊयात.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

कृषी सल्ला

पेरणी कधी करावी?
मागील आठवड्यामध्ये झालेला पाऊस हा मान्सून पूर्व पाऊस असल्याने अशा पावसावर अवलंबून पेरणी करू नये. मध्यम व विस्तारित स्वरूपाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता कपाशीची धूळ पेरणी टाळावी. पाऊस, वादळी वारा व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्याव इतर पाळीव जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. जनावरे हे खुल्या पाण्याचे स्त्रोत, नदी किंवा तलाव व ट्रॅक्टर व इतर धातूच्या अवजारांपासून दूर ठेवावे. वाऱ्याचा वेग लक्षात घेता फळबागा व भाजीपाला पिकांना बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा.

फळझाडांची काळजी
पावसाळ्यात शेतातील पाणी जागेवरच मुरविण्यासाठी तसेच अवघावासोबत मौल्यवान मातीचा थर वाहून जाऊ नये म्हणून जमिनीची मशागत करताना मुख्य उतारला आडवी किंवा समतल रेषा काढून या रेषेला समांतर करावी. सद्यस्थितीमध्ये असणारे तापमान लक्षात घेता, उन्हाळी भाजीपाला पिकाचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी ग्रीन शेड नेटचा वापर करावा. नवीन लागवड केलेल्या 1 ते 4 वर्ष वयाच्या फळझाडांच्या आळ्यात पाला पाचोळा, गव्हांड्याचे आच्छादन करावे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

खतांची उपलब्धता करून ठेवावी
लहान रोपांवर पऱ्हाटी किंवा तुऱ्हाटीचे छप्पर करावे. वाढत्या तापमानाचा अंदाज लक्षात घेता, शेतीमधील महत्वाची कामे ही सकाळी 11 वाजतापूर्वी करण्यास प्राधान्य द्यावे. माती परीक्षणासाठी मातीचे नमुने काढून ते अधिकृत किंवा शासकीय मृदा परीक्षण प्रयोगशाळेत योग्य शुल्कासह पाठवून माती परीक्षण अहवालानुसार पिक परत्वे कृषी निविष्ठाचे नियोजन करावे. शेतकरी बांधवांनी शिफारशीतील बियाणे व बीजप्रक्रियेसाठी लागणारी बुरशीनाशके आणि जीवाणू खताची
उपलब्धतता करून ठेवावी.

Web Title: Biparjoy cyclone threat to the state! Get expert agricultural advice before damage occurs

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button