ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Reserve Bank of India | सेंट्रल बँक ऑफ इंडिया अडचणीत ! रिझर्व्ह बँकेने केली मोठी कारवाई…

Reserve Bank of India |मागील दोन वर्षांत रिझर्व्ह बँकेने अनेक नागरी सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. नागरी सहकारी बँकांच्या नियमनाचे सर्व अधिकार रिझर्व्ह बँकेकडे गेल्यापासून बँकांवरील कारवाईमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सध्या आरबीआयने सेंट्रल बँक ऑफ इंडियाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियावर कारवाई

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सेंट्रल बँक ऑफ इंडियावर लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. फसवणूक आणि अहवालाशी संबंधित नियमांच्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) वर ८४.५० लाख रुपयांचा दंड रिझर्व्ह बँकेने ठोठावला आहे.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

म्हणून केली कारवाई

रिझर्व्ह बँकेने ३१ मार्च २०२१ रोजी सेंट्रल बँकेच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन केले होते. यासाठी मोठी तपासणी करण्यात आली होती. या तपासणीच्या अहवालातून असे दिसून आले की, बँकेने जॉइंट फोरम ऑफ लेंडर्स (JFL) ची खाती फसवणूक म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाच्या सात दिवसांच्या आत आरबीआयला फसवणूकीचा अहवाल दिला नाही.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

कारवाई झालेल्या एकूण बँका

२०२२-२३ या आर्थिक वर्षात RBI ने आठ सहकारी बँकांचे परवाने रद्द केले आहेत. यामध्ये मुधोळ सहकारी बँक, मिलथ को-ऑपरेटिव्ह बँक, श्री आनंद को-ऑपरेटिव्ह बँक, रुपी को-ऑपरेटिव्ह बँक, डेक्कन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, लक्ष्मी सहकारी बँक, सेवा विकास सहकारी बँक, बाबाजी दाते महिला अर्बन बँक या बँकांचा समावेश आहे.

एवढेच नाही तर मागील दोन आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेने एकूण १०३ सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. सहकारी बँकांच्या माध्यमातून ग्रामीण भागात बँकिंग सेवेचा मोठ्या विस्तार झाला आहे. मात्र या बँकांमधील अनियमितता समोर येत आहे. यामुळे आरबीआयला कठोर पावले उचलावी लागत आहेत.

Reserve Bank of india added alligations on central bank of india

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button