ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Voting ID | आता मतदानासाठी मतदार कार्ड नसले तरी चालेल! निवडणूक आयोग ‘ही’ 12 कागदपत्रे मतदानासाठी धरणार ग्राह्य

Voting ID | देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. पण अजूनही तुमचं मतदान कार्ड (Voting ID) आलेलं नाही का? तर आता चिंता नसावी कारण निवडणूक आयोगाने मतदार कार्डशिवाय 12 कागदपत्रे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरली आहेत. यापैकी एक पुरावा जरी तुम्ही दाखवला तर तुम्हाला मतदान करता येणार आहे.

कोणती आहेत 12 कागदपत्रे?
मतदानाच्या वेळी, निवडणूक आयोगाद्वारे जारी केलेले मतदान ओळखपत्र (EPIC) व्यतिरिक्त, खालील 12 ओळखपत्रे स्वीकार्य मानली जातील:

  1. पासपोर्ट
  2. वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)
  3. केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र ओळखपत्र
  4. बँक/टपाल विभागाकडून दिलेले छायाचित्र असलेले पासबुक
  5. पॅन कार्ड
  6. NPR अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांद्वारे जारी केलेले स्मार्ट कार्ड
  7. मनरेगा रोजगार ओळखपत्र
  8. निवृत्तीवेतनाची दस्तावेज
  9. संसद/विधानसभा/विधानपरिषदेच्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र
  10. आधार कार्ड
  11. दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक न्याय आणि सशक्तिकरण मंत्रालयाद्वारे जारी केलेले विशेष ओळखपत्र
  12. कामगार मंत्रालयाद्वारे वितरित केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button