ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Nanaji Krishi Sanjeevani Project | ब्रेकींग! नानाजी कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यास मान्यता; जाणून घ्या महत्त्वपूर्ण शासन निर्णय

Nanaji Krishi Sanjeevani Project | हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर, धाराशीव, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांतील 4 हजार 682 गावे तसेच जळगाव जिल्ह्यातील 460 गावे अशा एकूण 5 हजार 142 गावांमध्ये मे 2018 पासून जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (Nanaji Krishi Sanjeevani Project) राबवण्यात येत आहे. याबाबत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पामध्ये सद्य:स्थितीत समाविष्ट असलेल्या 16 जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अंदाजित 6 हजार कोटी किंमतीचा टप्पा 2 प्रकल्प राबविण्यास तत्वतः मान्यता तसेच या टप्पा 2 साठी गाव निवडीचे निकष व गावांची निवड करण्यासाठी अपर मुख्य सचिव, कृषि यांच्या अध्यक्षतेखाली गाव निवड समिती स्थापन करण्यासाठीच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने दि. 28 जून 2023 रोजी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

शासन निर्णय

जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पामध्ये सद्य:स्थितीत समाविष्ट असलेल्या 16 जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली अशा एकूण 21 जिल्ह्यांमध्ये अंदाजित 6 हजार कोटी किंमतीच्या जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा टप्पा- 2 राबविण्यास शासनाची तत्वतः मान्यता देण्यात येत आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा-2 च्या आखणीचे काम आणि गाव निवडीचे शाखशुद्ध पद्धतीने निकष ठरवून त्याआधारे टप्पा-2 साठी गावांची निवड करण्यासाठी गाव निवड समिती स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

आकडेवारी

  • 30 जून 2023 रोजी सेन्सेक्सने पहिल्यांदा 64000 चा टप्पा ओलांडला. सेन्सेक्सने अलीकडील 1000 चा टप्पा गाठण्यासाठी 144 सत्रे म्हणजे 7.1 महिने घेतले.
  • नवीनतम 5000 पॉइंट जंप नोंदवण्यासाठी 443 सत्रे किंवा 21.7 महिने लागले. गेल्या 20 वर्षांमध्ये किंमत परतावा निर्देशांकानुसार मोजलेला सेन्सेक्स CAGR 15.5% होता आणि निर्देशांक एकूण परतावा 17.2% होता.
  • जून-2003 मध्ये गुंतवलेल्या रु. 100000 ची किंमत 30-जून-23 पर्यंत TRI च्या दृष्टीने सुमारे 24 लाख रुपये (आणि PRI नुसार सुमारे 18 लाख रुपये) असेल.
  • एप्रिल 2017 मध्ये निर्देशांक 30,000 पर्यंत पोहोचण्यासाठी 31.3 वर्षे लागली. पुढील 30000 गुण पुढील 4.4 वर्षांत पूर्ण झाले. म्हणजेच येत्या काळात बाजारात तेजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
  • बीएसईचे एकूण बाजार भांडवल रु. 296.5 लाख कोटी रुपयांनी वाढून सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. ताज्या 1000 अंकांच्या मेळाव्यात 8 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
  • चालू आर्थिक वर्षात परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची इक्विटीमधील गुंतवणूक $10 अब्ज ओलांडली आहे, जी वाढतच आहे. यामुळे बाजारात आणखी उच्चांक निर्माण होईल.
  • चीनमध्ये जारी करण्यात आलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, फॅक्टरी क्रियाकलाप जूनमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात मंदावला आहे, जो भारताच्या हिताचा आहे. त्यामुळे गुंतवणूकदार भारताकडे वळत आहेत.
  • इक्विटी सारख्या जोखमीच्या मालमत्तेवर सट्टेबाजी करण्याच्या समजात लक्षणीय सुधारणा झाली आहे, जी भारतीय बाजारातील गुंतवणूकदारांच्या वर्तनात स्पष्टपणे दिसून येते.
  • जुलै महिन्यातील निफ्टीच्या वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास, दरवर्षी सरासरी 3.2% परतावा मिळतो.
  • गेल्या 20 वर्षांत निफ्टीने जुलैमध्ये 16 वेळा सकारात्मक परतावा दिला आहे. 2014 पासून, निफ्टी जुलैमध्ये फक्त एकदाच नकारात्मक झाला आहे. या वेळी जूनपासून चांगली चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Web Title:
Breaking! Approval to implement second phase of Nanaji Agricultural Sanjeevani Project; Know important government decisions

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button