ताज्या बातम्या

Antibiotic Production Subsidy | पशुखाद्य व वैरण निर्मितीसाठी तब्बल ५० लाख रुपयांपर्यंत अनुदान; त्वरित जाणून घ्या कसा करायचा अर्ज?

Subsidy up to Rs. 50 lakhs for production of animal fodder and fertilizers; Know instantly how to apply?

Antibiotic Production Subsidy | केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुखाद्य व वैरण निर्मितीसाठी ५० लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी nlm.udyamimitra.in या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करायचा आहे. योजनेचा उद्देश रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास, प्रती पशुची उत्पादकता वाढवणे आणि अशाप्रकारे विकास कार्यक्रमांतर्गत एका छत्राखाली मांस, बकरीचे दूध, लोकर, अंडी उत्पादन वाढविणे, वैरणीची उपलब्धता वाढविणे, प्रती पशुधन उत्पादन क्षमतेत वाढ करणे, पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा करणे, नाविण्यपुर्ण उपक्रमांस प्रोत्साहन देणे असा आहे.

योजनेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदार स्वत: किंवा त्यांच्याकडील तज्ञ हे प्रकल्पाशी संबंधीत प्रशिक्षित तसेच अनुभव असणे आवश्यक आहे. अर्जदारास त्याचे खाते असलेल्या शेड्युल्ड बँकेकडून संबंधित प्रकल्पासाठी कर्ज हमीपत्र आवश्यक आहे. प्रकल्पासाठी स्वतःची किंवा भाडेतत्वावरची जमीन आवश्यक तसेच KYC साठी आवश्यक कागदपत्रे.

वाचा : Anudan Yojna 2023 |राज्य सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना जनावरांच्या वैरण उत्पादनासाठी प्रोत्साहनपर बियाणे वाटप, जाणून घ्या पात्रता

ऑनलाईन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

 • सविस्तर प्रकल्प प्रस्ताव
 • प्रशिक्षण प्रमाणपत्र
 • अनुभव प्रमाणपत्र
 • जमिनिशी सबंधित कागदपत्र (स्वतःची किंवा भाडेकरार) ७/१२
 • प्रस्तावित प्रकल्प जागेचे जीओ टॅग छायाचित्र
 • स्वतःचे भांडवल/बँक किंवा वित्तीय संस्थांचे कर्ज बाबत पुरावा
 • पॅनकार्ड
 • वास्तव्य पुरावा
 • मागील ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट
 • कॅन्सल बँक चेक
 • आधार कार्ड
 • अर्जदाराचा फोटो
 • जात प्रमाणपत्र
 • शैक्षणिक प्रमाणपत्र
 • भागीदारी करार
 • वस्तु व सेवाकर नोंदणी प्रमणपत्र (लागु असल्यास)
 • कंपनी नोंदणी प्रमाणपत्र (FPO, FCO, Sec.8 कंपनीकरीता)
 • मागील ३ वर्षाचा ऑडीट रिपोर्ट (लागु असल्यास)
 • मागील ३ वर्षाचा आयकर विवरणपत्र (लागु असल्यास)

अर्जदारांनी १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत अर्ज सादर करायचा आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जवळील शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना येथील पशूधन विकास अधिकारी यांचाशी संपर्क साधावा. या योजनेमुळे पशुपालकांना पशुखाद्य व वैरण निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना आर्थिक लाभ होईल. तसेच, पशुधनाच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.

हेही वाचा :

Web Title: Subsidy up to Rs. 50 lakhs for production of animal fodder and fertilizers; Know instantly how to apply?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button