ब्रेकिंग न्यूज: राज्यात सोलर ऊर्जा निर्मितीची अंमलबजावणी सुरु, जाणून घ्या शेतकऱ्यांना कसे मिळणार सोलर पंप
राज्यात विजेची उपलब्धता नसलेल्या शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या माध्यमातून वीज उपलब्धता करून देणे. यासह ज्या शेतकऱ्यांकडे विजेची उपलब्धता आहे.
Solar Policy | त्यांना सोलर कृषी पंपाच्या (Solar Agricultural Pump) माध्यमातून सिंचनासह आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत (Source of income) मिळवून देण्यासाठी विजेची उपलब्धता नसलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने 31 डिसेंबर, 2020 रोजी अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण 2020 (Unconventional Energy Generation Policy 2020) निर्गमित केले आहे. या धोरणात अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी पुढच्या 5 वर्षासाठी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. अपारंपारिक ऊर्जा धोरण 2020 ची अंमलबजावणी (Implementation) सुरू झाली आहे. यासंदर्भातील अधिकृत माहिती महासंचालक रवींद्र जगताप यांच्या यांनी दिली आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अंमलबजावणी सुरू
अपारंपारिक ऊर्जा निर्मिती धोरण 2020 ची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. वीज कनेक्शन नसलेल्या शेतकऱ्यांना 52750 सौर कृषी पंप, वीज कनेक्शन असलेल्या शेतकऱ्यांना 10,000 सौर कृषी पंप, 6069 मोफत छतावरील सोलर, राज्यात अपारंपारिक ऊर्जा निर्मिती धोरण 2020 ची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
कोणत्या प्रकल्पापाचे उद्दिष्ट करण्यात आले निश्चित?
अपारंपारिक ऊर्जा धोरणामध्ये सौर ऊर्जेद्वारे 12 हजार 930 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प, पवन ऊर्जेद्वारे 2500 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प, ऊसाच्या चिपाडावर कृषी अवशेषांवर आधारित 1350 मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्प, 380 मेगावॅट लघुजल विद्युत निर्मिती प्रकल्प व शहरी घन कचऱ्यावर आधारित 200 मेगावॅट वीज निर्मिती अशा प्रकल्पाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
वाचा: Yojana | शेतकऱ्यांनो सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर मिळतय 50% अनुदान
अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण
• या धोरणाअंतर्गत उद्योग विभागाच्या मैत्री योजनेसारखी एक खिडकी वेब प्रणाली महाऊर्जाव्दारे विकसित करणे.
• 1500 कोटी रुपये वा त्याहून अधिक रकमेच्या प्रकल्पाला महाऊर्जाव्दारे सहाय्य अधिकारी उपलब्ध करणे.
• 25 मेगावॅट व अधिक क्षमतेचे प्रकल्प धारकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती गठीत करणे.
• अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्यासाठी ग्रीड कनेक्टीव्हीटी ही उद्दिष्टपूर्ती पर्यंत ‘हक्क’ म्हणून समजण्यात येईल.
• पारेषण जोड संमती प्रक्रिया सुलभ व जलद करण्यात येईल.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: