वैरण ही उत्तम दूध उत्पादनाची गुरुकिल्ली आहे, कारण दुभत्या जनावरांवर होणाऱ्या एकूण खर्चापैकी ६५ टक्के खर्च हा आहारावर होतो. हा खर्च कमी करण्यासाठी पुरेसा हिरवा चारा उपयोगी ठरतो.
जनावरांना मोठ्या प्रमाणात वर्षभर हिरव्या चाऱ्याच्या होऊ शकत असते परंतु वर्षभर जनावरांना हिरवा चारा देता येईल हे शक्य नाही त्यामुळे बहुतांश वेळा जनावरांना केवळ भुसा आणि कडबा खाऊ घातला जातो. त्यामुळे दुधाची उत्पन्नात घटते शिवाय जनावरांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो.
झटपट पटापट थोडासा विरंगुळा: वाचा बहारदार विनोद…
पावसाळ्यात तीन ते चार महिने हिरवा चारा उपलब्ध असतो या काळामध्ये मुरघास बनवून भविष्यातील हिरव्या चाऱ्याची टंचाई कमी करता येईल.
शेतामध्ये करा “या” यंत्राचा वापर..
मुरघास बनवण्याची पद्धत:
मुरघास म्हणजे हिरव्या चाऱ्याची हवाबंद पद्धतीने साठवून मुरवलेली/ आंबवलेली कुट्टी.मुरघास बनविण्यासाठी एक खड्डा किंवा टाकीमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेला हिरवा चारा कुट्टी करून २ ते ३ महिन्यांसाठी हवाबंद पद्धतीने साठवून ठेवतात. ज्या पिकांमध्ये शर्करायुक्त पदार्थाचे प्रमाणात जास्त असते ती पिके उदा. ज्वारी, मका, बाजरी, ओट, गजराज, यशवंत इ. (मुरघास तयार करण्याकरिता उत्तम असतात.) जमिनीत ६ फूट खोल तळाला ६ फूट रुंद व वरती ८ फूट रुंद असा आयाताकृती खड्डा/ चर करावा किंवा १५ ते २० फूट उंचीचे गोलाकार मोठे सिमेंट पाइप उभे करून त्यात हिरव्या चाऱ्याची कुट्टी घट्ट बसेल अशा पद्धतीने भरावी.
. खड्डा पूर्ण भरल्यावर त्याच्या पृष्ठभागावर ३ ते ४ फूट उंचीचा निमुळता ढीग तयार करावा आणि त्यावर पॉलिथिन टाकून निरुपयोगी गवत किंवा कडब्याच्या पेंढ्याचा थर देऊन लिंपावे.काही दिवसांनी लिंपणाला भेगा पडल्यावर पुन्हा लिंपून खड्यातील कुट्टी हवाबंद राहील याची काळजी घ्यावी.साधारणतः दोन महिन्यांत मुरघास तयार होतो. दोन महिन्यानंतर लहानसे छिद्र पाडून त्यातून मुरघास काढून घेण्याची व्यवस्था करावी, असा तयार मुरघास जनावरांना १५ ते २० किलोपर्यंत देता येतो.
मुरघास खाऊ घालण्याची पद्धत:
खड्ड्याला एक छोटेसे छिद्र पाडून आवश्यकतेनुसार मुरघास काढून घ्यावा, मुरघास काढून घेतल्यानंतर प्लॅस्टिकच्या पेपरने त्या चित्राचे तोंड बंद करावे.
दूध देणाऱ्या जनावरांना दिवसाला दहा ते पंधरा किलो मूरघास खाऊ घालावा, याची चव चांगली असल्याने जनावरे देखील आवडीने खातात.
) मी E शेतकरी बोलतोय, “सातबारा चा उतारा कसे नाव पडले ठाऊक आहे का?
कोरड्या चाऱ्यासोबत मुरघास खाऊ घातल्यास जनावरे आवडीने कोरडा चारा देखील खात असतात.
स्रोत: Dr. कोल्हे सर,
(लेखक कृषी क्षेत्रातील तज्ञ आहेत).
हे ही वाचा:
१) राज्यातील ९९ गावांना मिळाले मिळकत पत्रिका; पहा काय फायदे आहेत प्रॉपर्टी कार्डचे?