कृषी बातम्या

Soybean | शेतकऱ्यांना अग्रिम पिक विमा! ‘या’ रोगामुळे होणाऱ्या सोयाबीन नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Advance crop insurance for farmers! The cabinet meeting decided to immediately report the loss of soybeans due to this disease

Soybean | यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे नऊ जिल्ह्यांमध्ये पंचनामे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, सोलापूर, लातूर, वाशिम आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांचे निर्देश
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये विमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्यामुळे विम्याची मदत वेळेत करणे शक्य व्हावे आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळावा म्हणून प्राधान्याने हे पंचनामे करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की, यंदाच्या हंगामात राज्यातील १ कोटी ६९ लाख शेतकऱ्यांनी १ रुपयात पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला आहे.

वाचा : Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीक नुकसानीचे 1 हजार 106 कोटी आले, ‘या’ तारखेपासून होणार खात्यात जमा

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड पडला आहे. अनेक मंडळांमध्ये २१ दिवसांचा खंड पडला आहे. त्याचबरोबर एकाच दिवसात ६५ मीमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. अशा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम विमा देण्यात यावा, अशा पद्धतीचे आदेश निर्गमित केले आहेत. पीक विमा कंपन्यांनी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पुढील आठवड्यात पीक विमा कंपन्यांसोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे. या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा :

Web Title: Advance crop insurance for farmers! The cabinet meeting decided to immediately report the loss of soybeans due to this disease

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button