कृषी बातम्यायोजना

Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा होण्यास सुरुवात

Good news for farmers! Accumulation of crop insurance has started in the accounts of farmers in 'Ya' district

Crop Insurance | जळगाव जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या सर्व ७७ हजार ५०० केळी विमाधारकांना परतावे मिळावेत यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शासनदरबारी पाठपुरावा सुरू केला आहे. या पाठपुराव्याला यश आले असून, गुरुवारी (ता. २३) सुमारे १२ हजार शेतकऱ्यांना त्यांच्या मंजूर असलेल्या परताव्यांमध्ये ३२ कोटी रुपयांचा निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यात सुमारे ७७ हजार ५०० शेतकरी फळ पीकविमा योजनेत सहभागी झाले. या शेतकऱ्यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले होते. यात पीक पडताळणी व इतर कार्यवाही विमा कंपनीने वेळेत न केल्याने हकनाक विमाधारकांना त्रास झाला. नंतर सॅटेलाइट व एमआरसॅटच्या माहितीचा उपयोग करून केळी पिकाची पडताळणी विमा कंपनी व शासनाने नियम झुगारून सुरू केली.

यास शेतकऱ्यांचा विरोध होता. सरसकट सर्वच शेतकरी विमा परताव्यांसाठी पात्र आहेत, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत होते. यातच शासनाने फक्त ५३ हजार ८०० शेतकऱ्यांचेच केळी पिकासंबंधीचे विमा प्रस्ताव मंजूर केले. यातील सुमारे ४२ हजार शेतकऱ्यांचे परतावे दिवाळीच्या काळात आले.

वाचा : Cotton Rate | येत्या काळात कापसाचे दर वाढणार! शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने करावी कापसाची विक्री; जाणून घ्या किती मिळतोय भाव?

उर्वरित सुमारे १२ हजार शेतकऱ्यांचे परतावे आलेच नव्हते. यासंबंधी जळगाव लोकसभा क्षेत्राचे खासदार उन्मेष पाटील यांनी बुधवारी (ता.२२) व गुरुवारी (ता.२३) मुंबईत विमा कंपनीशी चर्चा केली. तसेच कृषी विभागाच्या वरिष्ठांची भेटही घेतली. तेथे सर्व कागदपत्र, माहिती सादर करून शासनाची पीक पडताळणी कशी अयोग्य आहे, असा मुद्दा मांडला. तसेच सर्व शेतकऱ्यांना परतावे दिले जावेत, अशी मागणी केली.

या मागणीचे शासनाने गांभीर्याने घेतले असून, गुरुवारी (ता.२३) सुमारे १२ हजार शेतकऱ्यांना त्यांच्या मंजूर असलेल्या परताव्यांमध्ये ३२ कोटी रुपयांचा निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या शेतकऱ्यांना पुढील काही दिवसांत त्यांचे परतावे मिळतील, असे कृषी विभागाने सांगितले आहे.

याशिवाय, मंजूर नसलेल्या इतर सुमारे २४ हजार शेतकऱ्यांच्या विमा प्रस्तावांपैकी सुमारे ११ हजार ३०२ शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्याचे काम हाती घेतले जाईल, असे कृषी विभागाने सांगितले आहे. उर्वरित सुमारे १० हजार शेतकऱ्यांच्या प्रस्तावांबाबतही सकारात्मक तोडगा निघेल, असे म्हटले आहे.

शिवाय, जिल्ह्यातील सर्व ७७ हजार ५०० केळी विमाधारकांना सरसकट परतावे मिळावेत, असे पत्र पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासन, कृषी विभागाला नुकतेच दिल्याची माहिती मिळाली आहे. या पत्रानुसार, सर्व शेतकऱ्यांना परतावे मिळण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Good news for farmers! Accumulation of crop insurance has started in the accounts of farmers in ‘Ya’ district

हेही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button