योजना

Crop Insurance | आनंदाची बातमी! यंदा शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड; राज्यातील तब्बल ३५ लाख शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पीक विमा

Good news! Farmers' Diwali will be sweet this year; As many as 35 lakh farmers in the state will get advance crop insurance

Crop Insurance | राज्यातील सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांचा अग्रीम पीक विमा मंजूर झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळून त्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यात उशिराने दाखल झालेला मान्सून आणि त्यात सप्टेंबर महिन्यात पावसाने मारलेली दडी यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठे नुकसान झाले होते.

शेतकऱ्यांची विम्याबाबत मागणी
सरकारने तातडीने नुकसान भरपाई जाहीर करावी, तसेच पीकविमा देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्यातील १५ जिल्हाधिकाऱ्यांनी भरपाईसंदर्भात अधिसूचना काढली. पण, पीकविमा कंपनीने सरसकट विमा देण्यास हरकत घेतली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.

वाचा : Buy Gold in Diwali | दिवाळीत सोने खरेदी करण्याचा विचार करत आहात? ही बातमी तुमच्यासाठी आहे!

अग्रीम पिक विमा जाहीर
यानंतर राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विमा कंपन्यांची राज्यव्यापी बैठक घेऊन सरसकट अग्रीम विमा देण्याबाबत भूमिका घेतली. दिवाळीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पीकविमा मिळाला नाही, तर आपणही दिवाळी साजरी करणार नाही, अशी कृषीमंत्र्यांनी जाहीर केली होती.

लाख शेतकऱ्यांचा अग्रीम पीकविमा मंजूर
अखेर भारतीय पीकविमा कंपनीने आपले आक्षेप मागे घेतले असून, राज्यातील २५ लाख शेतकऱ्यांचा अग्रीम पीकविमा मंजूर करण्यात आला आहे. यासाठी १७०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी दिवाळीचा सण आनंदात साजरा करण्याची संधी मिळणार आहे.

हेही वाचा :

Web Title: Good news! Farmers’ Diwali will be sweet this year; As many as 35 lakh farmers in the state will get advance crop insurance

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button